Last Updated: Tuesday, November 13, 2012, 19:03
www.24taas.com, कोलकाता कतरिना कैफ आणि सलमान खानच्या रोमान्सची चर्चा तर आजही सुरू असते. त्यांचं नातं आज कोणत्या वळणावर याची उत्सुकता अनेकांना आहे. एक हॉट जोडी म्हणून प्रेक्षकांनीही या जोडीला उचलून धरलं. त्यांच्या ब्रेकअपनंतरही त्यांच्या जवळीकीची चर्चा मीडियामध्ये जोरात सुरू होती. आणि यानंतर जर कतरिनानं सलमानला चक्क आपला ‘भाऊ’ म्हटलं तर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल? याचा अंदाज न लावलेलाच बरा.
आजच रिलीज झालेला सिनेमा ‘जब तक है जान’ची संपूर्ण टीम नुकतीच कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिली होती. शिफॉनसाडीमध्ये उपस्थित राहिलेल्या कतरिनाचा अंदाज बघून अनेक जण अगोदरच घायाळ झाले होते... आणि अशातच तिच्या एका वक्तव्यानं सगळ्या मीडियामध्ये एकच बॉम्ब फोडला.
‘सलमान हा मला माझ्या मोठ्या भावासारखा आहे’ असं कतरिनानं उपस्थितांसमोर बिनादिक्कतपणे म्हटलं. कतरिनानं कदाचित ही गोष्ट मजेत-मजेत म्हटलं असेल असंही म्हटलं जातंय. पण, ही गोष्ट जर सल्लूमियाँनं ऐकली तर त्याचं काय होईल?
शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्यावर चित्रीत केलेला ‘जब तक है जान’ हा यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपट मंगळवारी पडद्यावर दाखल झालाय.
First Published: Tuesday, November 13, 2012, 19:03