Last Updated: Sunday, November 17, 2013, 20:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेत्री सोनाक्षीनं सांगितलं की, दबंग खान सलमान आणि तिच्यामध्ये सर्व काही ठिक आहे. कोणत्याही कारणामुळं सलमान तिच्यावर नाराज नाही.
मध्यंतरीच्या काळात अरबाज खान आणि सलमान खान यांनी ऑफर केलेला सिनेमा करण्यास सोनाक्षीनं नकार दिला होता. यामुळं सलमान सोनाक्षीवर नाराज आहे, अशी बातमी सर्वत्र पसरली होती. या बातमीला सोनाक्षीनं पूर्णपणे चुकीचं सांगितलंय. सोनाक्षीनं सांगितलं की, “जर सलमान माझ्यावर नाराज आहे, तर ही बाब तुम्ही त्यालाचं जाऊन विचारा, मला नाही. सलमान माझ्यावर नाराज नाही आणि वृत्तपत्रातून जे काही छापलं गेलं, तसं काही एक नाही.”
विशेष म्हणजे, सलमानला आपला नवा सिनेमा ‘किक’मध्ये सोनाक्षीला घ्यायचं होतं. परंतु असं जमलं नाही आणि आता या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस काम करणार आहे. सोनाक्षीनं सांगितलं की, “आम्ही या सिनेमाबद्दल खूप आधीच चर्चा केली होती. परंतु खूप व्यस्त असल्याकारणानं, या सिनेमात मला काम करता आलं नाही.”
सलमान खानसह ‘दबंग’ या सिनेमामधून, सोनाक्षीनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आम्ही पुन्हा कधी एकत्र काम करु, हे मला माहीत नाही. कारण यावेळी आम्ही दोघंही आपापल्या सिनेमांच्या कामात व्यस्त आहोत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, November 17, 2013, 20:33