सलमाननं पुन्हा केला रिक्षातून प्रवास!Salman Khan again travel by Rickshaw

सलमाननं पुन्हा केला रिक्षातून प्रवास!

सलमाननं पुन्हा केला रिक्षातून प्रवास!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दबंग खान सलमान आपल्या हटके अंदाजानं चांगलाच प्रसिद्ध आहे. कधी बाईक वेड, तर कधी कार... पण सलमाननं मंगळवारी पुन्हा एकदा रिक्षातून प्रवास केलाय. विशेष म्हणजे त्यानं या प्रवासाबाबत ट्विटरवरुन माहितीही दिलीय.

सलमानची लाडकी कार रेंज रोव्हर सगळ्यांनाच माहितीय. मात्र ही कार मंगळवारी रात्री रस्त्यातच बंद पडल्यानं सलमान चक्क रिक्षातून निघाला.

सल्लूमियाँला या रिक्षा प्रवासाचा खूप चांगला अनुभव आला असून आपण ही रिक्षा राईड एँजॉय केल्याचं ट्विटरवरुन सांगितलं. सलमान म्हणतो... Kal raat ko jab gadi bandh padi had to take a rick home, really enjoyed the rickshaw ride : ) - Salman Khan (@BeingSalmanKhan) October 8, 2013

तसंच वारंवार बिघडणाऱ्या रेंज रोव्हर आणि त्यांच्याकडून न मिळणाऱ्या ग्राहक सेवेवर सलमाननं टीका केली. सलमान ट्विटरवर म्हणतो- so kinda pissed with the attitude of the people at Range Rover they hv no concept of customer service. - Salman Khan (@BeingSalmanKhan) October 8, 2013

The company guys say its a heavy car so the break pads vil wear off hehehe toh bus truck aur train n planes ka rose badalte hongay kya. - Salman Khan (@BeingSalmanKhan) October 8, 2013
सलमाननं पुन्हा केला रिक्षातून प्रवास!


सलमाननं आपल्या रेंज रोव्हरची किती वाईट परिस्थिती आहे, हे सुद्धा ट्विटरवरुन सांगितलं. आतापर्यंत तब्बल ९ वेळा गाडीचे ब्रेक फेल झाल्याचं सलमान सांगतो. - Meri bichari Range Rover ke hal kharab hai in last 1&1/2 yrs 9times brakepads hv failed 1bari pura suspension gaya or kal gadi he baith gayi - Salman Khan (@BeingSalmanKhan) October 8, 2013

एकूणच काय तर रेंज रोव्हरच्या ग्राहक सेवेमुळं सल्लूमियाँच्या फॅन्सचा मात्र फायदा झाला. सलमानच्या रिक्षा राईडमुळं त्याच्या फॅन्सना त्याला रिक्षातून प्रवास करतांना बघायला मिळालं. सलमानचा रिक्षा प्रवास हा काही पहिलाच नाहीय याआधीही अमृता अरोराच्या लग्नाहून येतांनाही सलमाननं रिक्षातून प्रवास केला होता.

First Published: Thursday, October 10, 2013, 12:16


comments powered by Disqus