सलमानने मागितले ८० कोटी!, Salman Khan demands R 80 crore for `Kick`!

सलमानने मागितले ८० कोटी!

सलमानने मागितले ८० कोटी!

www.24taas.com,मुंबई
दबंगनंतर एकापाठोपाठ एक हीट चित्रपट दिल्यानंतर सलमान खानने आपला भाव वाढवला असून निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या ‘किक’ या चित्रपटासाठी ८० कोटींची मागणी केली आहे. यापूर्वी त्याने या चित्रपटासाठी ७० कोटी रुपयांची मागणी केली होती. आता आणखी १० कोटी मागितल्याने नाडियादवालांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

किक या चित्रपटाच्या घोषणेनंतर काही दिवसांतच सलमानने मानधन वाढवले. तरुणवर्गात अत्यंत लोकप्रिय असलेल्या सलमानला बॉलीवूडमध्ये बरीच मागणी आहे. साजिद नडियादवालाशी मैत्री असतानाही त्याने मानधन १० कोटींनी वाढवून मागितले. याबाबत साजिद सलमानशी बोलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सलमानचा दबंग-२ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याने मानधनात वाढ केल्याचे सांगितले जाते. या पार्श्वशभूमीवर किकसाठी तो नेमकी किती रक्कम घेणार, हे काही दिवसांतच कळेल. सलमानने मानधन वाढवल्यामुळे निर्मात्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. सलमानची ही ८० कोटींची किक प्रेक्षकांना किती आवडते, हे काही दिवसांनी समजेल.

First Published: Wednesday, December 5, 2012, 13:11


comments powered by Disqus