Last Updated: Friday, January 17, 2014, 15:58
www.24taas.com झी मीडिया, दबंग सलमान खान थ्रीडी शोले पाहून भारावून गेला. १९७५मध्ये प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी यांचा शोले नुकताच थ्रीडी स्वरूपात पुनः प्रदर्शित झाला. याची भुरळ सलमानला पडली आणि तो पाहायला गेला आणि भारावला.
चित्रपटाचे पटकथाकार सलीम खान यांचा पुत्र सलमान खानने ट्विटरवर चित्रपटाबद्दल गौरोउद्गार काढले, शोले हा आजही सर्वोत्तम चित्रपट आहे. तुम्हाला सुद्धा हा सिनेमा पाहायाला हवा. थ्रीडी चित्रपट हा एक अतभूत अनुभव आहे. तुम्ही तुमच्या बच्चेकंपनी सोबत या चित्रपटाचा आनंद घ्या. असे आवाहन सलमानने केलेय.
या चित्रपटात ज्यांनी जय ही व्यक्तीरेखा साकरलेली आहे. त्या अमिताभ बच्चन यांनादेखील सलमानच्या या सकारात्मक प्रतिक्रियेने आनंद झाला आहे. सलमान आणी अमिताभ यांची भेट गिल्ड समारंभात झाली होती. त्यावेळी सलमानने शोले चित्रपटाची भरभरून प्रशंसा केल्याचे अमिताभ यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 17, 2014, 15:58