Last Updated: Tuesday, April 22, 2014, 14:00
www.24taas.com, झी मीडिया, लंडनदबंगस्टार सलमान खान याने जबरदस्त स्टंट केलाय. त्याने आगामी आपल्या `किक` सिनेमासाठी जीवावर उदार होऊन हा स्टंट केलाय. त्याने चक्क 40 व्या मजल्यावरून उडी मारली आहे.
पोलंडमध्ये आपल्या आगामी `किक` सिनेमाच्या शुटिंगच्यावेळी तासाभरासाठी सर्वांचाच श्वास रोखला गेला होता. चित्रपटासाठी अनेक साहसी दृश्ये करावयाची आहेत. त्यापैकी एका साहसी दृश्यासाठी तो ४० मजल्याच्या इमारतीला लटकला होता.
सलमानच्या या साहसी दृश्याकरिता योग्य ती काळजी घेण्यात आली होती. पण, पोलंडच्या सर्वात उंच इमारतीवरून सलमानने हा स्टंट स्वतः करणे आश्चर्यकाराक होते. `किक` हा सिनेमा ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 22, 2014, 13:56