सलमान खानचा जबरदस्त स्टंट, 40 व्या मजल्यावरून...

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 14:00

दबंगस्टार सलमान खान याने जबरदस्त स्टंट केलाय. त्याने आगामी आपल्या `किक` सिनेमासाठी जीवावर उदार होऊन हा स्टंट केलाय. त्याने चक्क 40 व्या मजल्यावरून उडी मारली आहे.

चला नोकरीची संधी: पोस्टात देशभरात ८२४३ जागा

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 12:48

भारतीय पोस्टात २२ विभागांमध्ये पोस्टल असिस्टंटची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०१४ आहे. महाराष्ट्रामध्ये पोस्टल असिस्टंटची ७९० पदे आणि सॉर्टिग असिस्टंट इन रेल्वे मेल सर्व्हिसेसची १७० पदे भरण्यात येणार आहेत. तर संपूर्ण देशात ८२४३ जागा आहेत.

सांगलीचा स्टंटबॉय...८ वर्षांचा रत्नजीत

Last Updated: Sunday, February 2, 2014, 19:42

काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट करणं ही काही फक्त परदेशी तरुणांची मक्तेदारी नाही. कारण आता भारतातही असे स्टंट करणारे अनेक आहेत. मात्र सांगलीतल्या चिमुकल्याला पाहिलं तर तुम्ही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. मात्र या स्टंटचं अनुकरण करून जीव धोक्यात घालू नका. कारण सांगलीच्या स्टंटबॉयला जमलं ते तुम्हाला जमेलच असं नाही.

नोकरीची संधी: कावेरी ग्रामीण बँकेत ७१६ जागा

Last Updated: Monday, December 16, 2013, 16:25

कावेरी ग्रामीण बँक ही एक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, २०१२मध्ये कर्नाटकातील तीन क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणानंतर ही बँक निर्माण झालीय. बँकेचं मुख्य कार्यालय म्हैसुरला असून कर्नाटक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बँकेच्या शाखा आहेत.

त्याच्या धूम स्टाईलने तिचा जीव घेतला...

Last Updated: Thursday, October 3, 2013, 10:41

वडाळ्यात बाईकचे स्टंट करताना मोहम्मद कुरेशी या बाईकस्वाराचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि त्याची भरधाव बाईक फूटपाथ वरील एका झोपडीत घुसली

वेगळ्या विदर्भाची मागणी नव्हे… ही तर स्टंटबाजी!

Last Updated: Saturday, September 28, 2013, 18:15

विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यासंबंधी झालेल्या ‘नागपूर करारा’ला आज ६० वर्षे पूर्ण झाली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज या कराराची होळी केली.

रेल्वे रुळांखाली झोपण्याचा जीवघेणा स्टंट!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 11:34

धावत्या रेल्वेतली स्टंटबाजी आपण आजवर पाहिलीय. पण धावत्या ट्रेनखाली स्टंट करणारी ही दृश्यं हादरवून टाकणारी आहेत. ही मुलं ज्या पद्धतीनं स्टंट करण्यासाठी रेल्वे रूळावर झोपताहेत. लोकल ट्रेन वरून जाईपर्यंत रूळावरच झोपून राहताहेत. हा सगळाच प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.

मुंबईमध्ये रात्री धूम स्टाईल, स्टंट करणाऱ्यांकडून ४ कोटी वसूल

Last Updated: Saturday, September 21, 2013, 09:19

मुंबईमध्ये रात्री धूम स्टाईल रंगणा-या स्टंट रेसिंगला आळा घालण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. वाहतूक पोलिसांनी मुंबईतल्या तब्बल साडेचार लाखांपेक्षा जास्त बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.

लोणावळ्यातील स्टंट विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 13:12

अती उत्साहाच्या भरात केलेलं साहस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे. ही घटना लोणावळ्यात घडलेय. त्यांने दोन पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला.

लोकलमधील स्टंटबाजी बेतली जीवावर!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 21:15

लोकल ट्रेनमध्ये मोहसीन ट्रेनच्या दरवाजात लटकत होता. त्यातून त्याला आनंद मिळत होता. आपण काही तरी वेगळ करतो आहोत असं त्याला वाटत होतं. पण पुढे दबा धरुन बसलेल्या मृत्यूने त्याला गाठलचं..

३३०० फूट उंचावरून महिलांचा स्टंट

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 14:24

डरके आगे जित है... या वाक्याची प्रचिती कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कमध्ये आलीय... कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कच्या पहाडावर जमिनीपासून तब्बल ३३०० फूट उंच पहाडावरून दोरीवर चालण्याचा विक्रम दोन महिलांनी केलाय.

जॅकी चॅनचा दुसऱ्यांदा मृत्यू...

Last Updated: Thursday, August 8, 2013, 15:16

‘आपल्याच मृत्यूची बातमी वाचून धक्का बसला आणि वाईटही वाटलं’ असं स्पष्ट केलंय ५९ वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅननं…

मुंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर

Last Updated: Monday, July 29, 2013, 18:11

रेल्वे लोकलच्या दारात उभं राहून स्टंटबाजी करणा-या एका तरूणाला जबर फटका बसलाय. स्टंटबाजी करताना हा तरूण टिळकनगर स्थानकाजवळ ट्रेनखाली पडला. या अपघातात दुर्दैवाने त्याचा पाय कापावा लागलाय.

स्टंट बाईकर्सवर पोलिसांचा गोळीबार, एक जण ठार

Last Updated: Sunday, July 28, 2013, 19:50

संसद भवन जवळ असलेल्या ली मेरिडीयन परिसरात स्टंट करणाऱ्या बाईक्सवाल्यांवर पोलिसांनी गोळीबार केला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्टंट, मृत्यूचा खेळ !

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 22:34

स्टंट करतांना एका स्टंटमॅनला आपला जीव गमवावा लागलाय. तो सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंट करणं कितपत योग्य आहे ? असा सवाल आता केला जात आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये स्टंट करतेवेळी जी घटना घडला ती हादरवून सोडणारी आहे. हजारो फूट उंचीवर स्टंट करतांना एका स्टंटमॅनचा मृत्यू झालाय.

गिनीज बुक विक्रमवीर स्‍टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यू

Last Updated: Monday, April 29, 2013, 12:43

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या एका विक्रमवीराचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालाय. पश्चिम बंगालमध्ये होमगार्ड असलेले ४९ वर्षीय शैलेंद्रनाथ रॉय यांचा विश्वविक्रम करतानाच असंख्य समर्थकांसमक्षच मृत्यू झाला.

ही पहा बाईकवरची जीवघेणी स्टंटस....

Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:11

लोकांच्या जल्लोषावर विरजण टाकण्याची सवय काही जणांना असते... प्रजासातक दिनी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना, नागपुरात काही अतिउत्साही युवकांनी इतरांना त्रास देण्यातच धन्यता मानली...

पाण्यामध्येही चालणारा 'सोनी एक्सपिरीया झेड'

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 14:57

पावसाळ्यात मोबाईलचा बचाव करण्यासाठी प्लास्टिकचं कव्हर वापरता... उन्हाळ्यात हाताला घाम येऊनही मोबाईल ओला होऊ नये, म्हणून टिश्यू पेपर वापरता... आणि पाण्यात काम करताना किंवा आंघोळ करताना तर आलेला कॉल घेणंही टाळता... असंच काहीसं तुम्हीही करत असाल ना!

अबू आझमींचा चेक, की नुसतीच 'फेकाफेक'?

Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:30

राज ठाकरेंना दोन कोटींच्या बक्षीसाचं आव्हान देणा-या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण समाजवादी पार्टीच्या खात्यात दोन कोटींची रक्कमच नसल्याचं स्पष्ट झालंय.

‘अॅक्शन बंद...’ सल्लूला डॉक्टरांचा सल्ला

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 12:17

अभिनेता सलमान खानची प्रकृती पुन्हा नाजूक अवस्थेत आहे. डॉक्टरांनी त्याला अॅक्शनपट करण्यास मनाई केली आहे.

जॅकी चॅन थकला, यापुढे स्टंट करणार नाही

Last Updated: Sunday, May 20, 2012, 12:32

ज्याने आपल्या स्टंटने साऱ्या जगाला वेड लावले, आणि त्याचे खरे स्टंट पाहण्यासाठी लहानांपासून सगळेच उत्सुक असायचे असा आपला आवडता मार्शल आर्टचा सुपरस्टार जॅकी चॅनने अॅक्शन हिरोच्या भुमिकेतून संन्यास घेतला आहे.