सलमान खानचे चोरी चुपके...लग्नाच्या बेडीत!, Salman Khan is now married?

सलमान खानचे चोरी चुपके...लग्नाच्या बेडीत!

सलमान खानचे चोरी चुपके...लग्नाच्या बेडीत!
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

बॉलिवुडचा दबंग सलमान खान चोरी चुपके गोव्यात आपल्या रोमानियन गर्लफ्रेंड सोबत दिसला. सलमान गोव्यात आपल्या आगामी सिनेमाचे शूटींग करण्यात मग्न आहे. मात्र, युलियालासोबत तो डेटिंग करताना दिसत आहे.

सल्लूची लोकप्रियता चांगली असल्याने त्याच्या लाखो दिल की धडकन आहेत. मात्र, दबंग खान आता बोहल्यावर चढण्याच्या बेतात आहे. त्यामुळे सलमान आपल्या प्रेमाबरोबर घर बसविण्याचे स्वप्न पाहात आहे. मात्र, त्याची होणारी बायको ही भारतीय नाही. ती आहे रोमानियाची मैत्रिण. तिचं नाव आहे, युलिया वंतूर. ती रोमानियन टिव्ही अॅक्ट्रेस युलिया वंतूर. या युलियाला सल्लू आपला खास वेळ देत आहे.

ती निळ्या डोळ्याची सुंदर विदेशी बाला आहे. ती सध्या सलमान खानच्या कुटुंबियांजवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहे. ती सलमानच्या बांद्रा येथील घरी गेलीही आहे. तिच्याबरोबर आता तरी चांगले सुरू आहे. अशीच बात राहिली तर सलमान खान तिच्या सोबत संसार करण्यास सज्ज आहे. तिला जीवनसाथी बनवण्यास तो यशस्वी होईल.


असे असले तरी सलमानच्या पाठिमागे अनेक विघ्न आहेत. तो शिकार प्रकरणी तर काही जणांच्या मृत्यूप्रकरणी त्याच्याविरूध्द निकाल लागायचा आहे. त्यामुळे लग्नाच्याबाबतीत तो एक पाऊल मागे जाण्याची शक्यता आहे. तर त्याचे वय आता ४६च्या घरात गेले आहे. त्यामुळे त्यांने आता लग्न केले नाहीतर, पुढे कोण लग्न करणार हाही त्याच्यापुढील मोठा प्रश्न आहे.

याआधी सलमानचे प्रेम प्रकरणे गाजली आहेत. अभिनेत्री संगिता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांच्या नावाशी त्याच्या अफेअरच्या बातम्या उठल्या होत्या. मात्र, त्या बातम्या पुरत्याच ठरल्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 13:08


comments powered by Disqus