सलमानच्या बॉ़डीवर माधवन फिदा..., Salman Khan`s fitness training `killed` Madhvan

सलमानच्या बॉ़डीवर माधवन फिदा

सलमानच्या बॉ़डीवर माधवन फिदा
www.24taas.com, नवी दिल्ली

सलमानच्या ‘सिक्स पॅक्स’वर अनेक तरुणी फिदा आहेतच, आता यामध्ये आणखी एकाची भर पडलीय. पण, ती एखादी मुलगी किंवा अभिनेत्री नव्हे... तर एक अभिनेता सलमानच्या बॉडीवर फिदा झालाय. तो आहे आर. माधवन...

सलमानबरोबर व्यायाम करण्याची संधी माधवनला नुकतीच मिळाली. ‘जेव्हा मी सलमानसोबत पहिल्यांदा व्यायाम केला, तेव्हा मी सर्वात ताकदवान असण्याचा माझा गैरसमज दूर झाला’ असं हिंदी आणि तामिळ सिनेअभिनेता आर. माधवननं म्हटलंय.

‘सलामानचं प्रशिक्षण खूप सहज आणि आकर्षक आहे आणि ते पाहून मी फक्त बघतच राहिलो. कोणी कसं एवढं ताकदवान असू शकतं’ असा प्रश्नही मला यावेळी पडला.

आर. माधवन अनेक हिंदी आणि तामिळ अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमधून प्रेक्षकांसमोर आलाय. आमीर खानसोबत त्यानं थ्री इडियटमध्येही महत्त्वाची भूमिका निभावली होती. ४२ वर्षीय माधवन २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'जोडी ब्रेकर्स' या सिनेमामध्ये शेवटचा प्रेक्षकांना पडद्यावर दिसला होता.

First Published: Tuesday, March 26, 2013, 18:26


comments powered by Disqus