सलमानच्या `जय हो`नं नाही तोडला `एक था टायगर`चा रेकॉर्डSalman Khan`s `Jai Ho` fails to supersede `Ek

`जय हो`पडला `एक था टायगर`पेक्षा कमी

`जय हो`पडला `एक था टायगर`पेक्षा कमी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सलमान खानचा अॅक्शन पॅक्ड चित्रपट `जय हो` रिलीज होऊन अवघे दोनच दिवस झाले आहेत. मात्र फॅन्ची अपेक्षा जय हो पूर्ण करू शकत नाहीय. `जय हो`ची पहिल्या दिवसाची कमाई ही सलमानच्याच `एक था टायगर`च्या पहिल्या दिवसाच्या कमाई पेक्षाही कमी झालीय. `जय हो` हा रेकॉर्ड तोडू शकलेला नाही.

आकडेवारीनुसार आणि चित्रपट समिक्षक तरन आदर्श यांच्यानुसार सल्लूमियाँच्या `जय हो`च्या पहिल्या दिवसाची कमाई ही १७.५५ कोटी इतकी झाली. ही कमाई `एक था टायगर`च्या जवळपासही जात नाही. एक था टायगरच्या पहिल्या दिवसाची कमाई ही जवळपास ३३ कोटी होती.

मात्र तरीही आजची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी बघता चित्रपट चांगली कमाई करेल, असं समिक्षकांचं म्हणणं आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 26, 2014, 11:11


comments powered by Disqus