सलमान बनणार पुन्हा `प्रेम`! Salman Khan to reunite with Sooraj Barjatya?

सलमान बनणार पुन्हा `प्रेम`!

सलमान बनणार पुन्हा `प्रेम`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सुरज बढजात्या आणि सलमान खान यांनी आत्तापर्यंत मैने प्यार किया, हम आपके है कौन आणि हम साथ साथ है सारखे सिनेमे दिले आहेत. कौटुंबिक मनोरंजनाने भरलेला तसाच आणखी एक सिनेमा सुरज बढजात्या पुन्हा घेऊन येत आहे आणि सलमान खानही या सिनेमासाठी स्पेशल वेळ काढणार आहे.

सुरज बढजात्याच्या सिनेमांनी सलमान खानला स्टार बनवलं. त्याचं `प्रेम` हे नामकरणही प्रेक्षकांमध्ये सुरज बढजात्याच्या सिनेमांमुळेच प्रसिद्ध झालं. मात्र हम साथ साथ या सुरज बढजात्याच्या सिनेमाच्याच शुटिंग दरम्यान सलमान खाने काळविटांची शिकार केली आणि त्य़ानंतर सिनेमांतही नीतिमान नायक दाखवणाऱ्या सुरज बढजात्यांनी सलमान खानला आपल्या पुञढील सिनेमांमधून रजा दिल्याचं म्हटलं जातं. मात्र आता पुन्हा सुरज बढजात्या यांना सलमान खानला घेऊन कौटुंबिक सिनेमा काढण्ची इच्छा आहे. सलमान खानकडे खरंतर अजिबात वेळ नाही. मात्र सलमानलाही सुरजसोबत काम करायची इच्छा असल्याने आपल्या कामातून वेळ काढून काही तारखा त्याने सुरज बढजात्याला दिल्या आहेत.

सलमान खानने सुरज बढजात्यांसोबत सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त करत निर्माते बोनी कपूर यांच्याकडे काही तारखा मागून घेतल्या. बोनी कपूर निर्मित ‘नो एंट्री २’ या सिनेमाच्या सर्व तारखा सलमानने सुरज बढजात्याना दिल्या आणि त्यामुळे आधी सुरज बढजात्यांचा सिनेमा पूर्ण करून नंतरच ‘नो एंट्री २’ सिनेमाचं शुटिंग सुरू होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, May 26, 2013, 16:48


comments powered by Disqus