सलमान टाकतोय शाहरुखच्या पावलावर पाऊल, salman searching a house in dubai

सलमान टाकतोय शाहरुखच्या पावलावर पाऊल

सलमान टाकतोय शाहरुखच्या पावलावर पाऊल
www.24taas.com, नवी दिल्ली

बॉलिवूडमधल्या दोन ‘खान’मधली टशन आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. हे दोन खान म्हणजे सलमान आणि शाहरुख... एकमेकांना मागे टाकण्यासाठी दोघांची चाललेली धडपडही सगळ्यांच्याच परिचयाची... पण, आता सलमान मात्र शाहरुखच्या पावलावर पाऊल टाकायला निघालाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुखप्रमाणेच सलमान खानलाही दुबईमध्ये आपल्या मालकीच एक घर असावं अशी स्वप्न पडायला लागलीत. त्यामुळेच सध्या शूटींगबरोबरच आपल्याला साजेसं घरं शोधण्याचं काम सलमान करतोय. ४७ वर्षीय सलमान दुबईमध्ये आपल्या आगामी मेंटल या सिनेमाचं शूटींग करतोय.

दुबईमध्ये एका मुलाखतीदरम्यान सलमानचा भाऊ सोहेल खान यानं या बातमीला पृष्टी दिलीय. आमचा परिवाराला दुबईमध्ये घर घेण्याची इच्छा आहे, मुंबईतून इथं पोहचण्यासाठी केवळ अडीच तास लागतात आणि आम्हालाही दुबईत गुंतवणूक असावी असं वाटलं त्यामुळे आम्ही योग्य गुंतवणुकीसाठी योग्य जागा शोधतोय आणि तिथंच आमचं दुसरं घरं असेल, असं सोहेलनं म्हटलंय.

First Published: Saturday, March 16, 2013, 11:11


comments powered by Disqus