Last Updated: Sunday, March 3, 2013, 16:41
www.24taas.com, मुंबईसलमान खानची ‘बॅड बॉय’ इमेज पुन्हा एकदा पुढे आली आहे. सलमान खानवर आणि त्याच्या सुरक्षारक्षकांवर मच्छीमारांना धमकावण्याचा, मारहाण केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच सलमान खानने मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान केल्याचा आरोपही त्याच्यावर होत आहे.
वांद्र्याच्या चिम्बई भागात शेकडों वर्षांपासून काही मच्छिमार राहातात. मात्र या परिसरात सलमान खानने दोन बंगले विकत घेतल्यापसून या मच्छिमारांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. वांद्र्याच्या समुद्र किनारीच सलमान खानने बॅले व्हिव आणि बेनमार नावाचे दोन बंगले विकत घेतले आहेत. मात्र आपलं नवीन घर सजवताना तो इतर मच्छिमारांची घरं उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. इथे पूर्वीपासून राहाणाऱ्या मच्छिमारांना सलमान खान हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे.
या भागातील एका मच्छिमाराने यासंदर्भात सांगितलं, “जेव्हापासून या लोकांनी इथे घरं विकत घेतली आहेत, अम्हाला त्रास द्यायला सुरूवात केली आहे. सलमान खानने स्वतः येऊन मला इथून निघून जाण्याची धमकी दिली होती.” तर दुसऱ्या मच्छिमाराने सांगितलं, “रात्री दारू पिऊन सलमान खानचे बॉडिगार्ड्स आले होते. त्यांनी आम्हाला खूप घाणेरड्या शिव्या दिल्या.”
सलमान खानला आपलं घर आणि समुद्र यांच्यामध्ये कुणीही आलेलं नको आहे. तसंच समुद्रात त्याला आपली यॉट पार्क करायची असते. त्यामुळे थे आधीपासून राहाणाऱ्या मच्छिमारांना हाकलून लावण्याचा सलमान खानचा प्रयत्न आहे. यासंदर्भात सलमान विरोधात पोलीस तक्रार करूनही पोलीस तक्रार नोंदवण्यास नकार देत आहेत.
First Published: Sunday, March 3, 2013, 16:39