गुड न्यूज : मुंबई झाली आणखी सुपरफास्ट...

Last Updated: Monday, June 16, 2014, 21:03

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे दोन मोठे प्रकल्प आज मुंबईकरांसाठी खुले झाले आहेत. खेरवाडी फ्लायओव्हरच्या दक्षिण दिशेकडील मार्गिकेचं उदघाटन झालंय.

व्हिडिओ : भारतातलं पहिलं तरंगतं हॉटेल... मुंबईत!

Last Updated: Thursday, May 22, 2014, 12:15

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पहिल्या तरंगतं हॉटेल पाहायला मिळतंय. वांद्रे-वरळी सी लिंकच्याजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यावर हे तीन मजली हॉटेल बनलंय.

जावयासह गांधी कुटुंबावर मोदींचा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 13:32

अवघ्या १ लाखांचे ३०० कोटी रुपये करणारा जादूगार कोण आहे?, असा सवाल करत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर तोंडसुख घेतलं. कल्याणच्या सभेत झालेल्या छोटेखानी भाषणात मोदींनी काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. अमेरिकेतल्या.... या मासिकात रॉबर्ट वडेरांबद्दल आलेल्या एका लेखाचा हवाला देऊन मोदींनी ही टीका केली.

वांद्रे-वरळी सी लिंकवरही मनसेची `टोळधाड`

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:53

मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी वांद्रे-वरळी सी लिंक टोलनाक्यावर राडा करत टोलनाक्याची मोडतोड केली. तोडफोड प्रकरणी वांद्रे पोलिसांनी माजी नगरसेवक कप्तान मलिक यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सी-लिंकवर अपघाताला कारण उंदीर...

Last Updated: Saturday, January 4, 2014, 14:33

सागरी सेतूवर शुक्रवारी सकाळी एका उंदरामुळे भरधाव जाणार्या गाड्या १५ मिनिटे खोळंबल्या. उंदराला वाचवण्यासाठी स्विफ्ट कार चालकाने गाडी वळवण्याचा प्रयत्न केल्याने मागून येणारी मर्सिडीझ कार डिव्हायडरला आदळली. सी-लिंकवरील या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

`काँग्रेस चले जाव`... मोदींची मुंबई रॅली यशस्वी!

Last Updated: Sunday, December 22, 2013, 19:39

मुंबईत झालेल्या भव्य सभेत मोदींनी नवा नारा दिला. पक्षासाठी नाही तर देशासाठी व्होट करा असं आवाहन करताना त्यांनी ‘व्होट फॉर इंडिया’ असा नवा नारा दिला.

मोदींचं संपूर्ण भाषण : `व्होट फॉर इंडिया`...

Last Updated: Sunday, December 22, 2013, 19:42

उत्तर प्रदेशातील सभेत `विजयाचा शंखनाद` करणारे नरेंद्र मोदी सध्या मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये आपल्या घणाघाती भाषणानं लोकांना प्रभावित करत आहेत.

मोदींच्या सभेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

Last Updated: Sunday, December 22, 2013, 08:59

मुंबईत आज नरेंद्र मोदींची भव्य सभा होतेय. मात्र मोदींच्या या सभेवर दहशतवादी हल्ल्याची छाया आहे.

मोदींची आज मुंबईत ‘महागर्जना’, १० हजार चहावाल्यांना निमंत्रण

Last Updated: Sunday, December 22, 2013, 08:39

उत्तर प्रदेशातील सभेत `विजयाचा शंखनाद` करणारे नरेंद्र मोदी आज मुंबईत `महागर्जना` करणार आहेत. दिल्लीच्या सिंहासनावरून काँग्रेसला खाली खेचण्यासाठी नरेंद्र मोदींना मराठी मावळ्यांची दमदार फौज सोबतीला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीनं महाराष्ट्राच्या भूमीत मोदी काय महागर्जना करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

मोदींच्या ‘महागर्जने’साठी मुंबई सज्ज!

Last Updated: Saturday, December 21, 2013, 08:42

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची उद्या मुंबईत सभा होतेय.२२ डिसेंबरच्या या रॅलीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागलेत.

रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित घराची `लाईफलाईन` मिळणार?

Last Updated: Thursday, October 3, 2013, 13:23

रेल्वे... मुंबईची लाईफलाईन... मात्र, ही लाईलाईन चालवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं जीवन अत्यंत विदारक आहे. गेली अनेक वर्षे हे कर्मचारी मुंबईतल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये रहातात. पण जीव मुठीत धरूनच...

वांद्र्यात छेडछाड काढणाऱ्यांना महिलांचा चोप

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 21:41

मुंबईत छेडछाडीच्या घटना थांबताना काही दिसत नाहीय. नुकतीच वांद्रेमध्ये एका कामगार महिलेची छेड काढल्याचं उघड झालंय.

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ तरुणीचा मृतदेह आढळला

Last Updated: Monday, September 23, 2013, 08:13

मुंबईतल्या वांद्रे सी लिंकजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. हा मृतदेह दोन भागात कापण्यात आल्याचं समोर आलंय. या महिलेचं वय जवळपास २५ वर्ष होतं. हत्येचं कारण अजून असप्ष्ट आहे.

प्रियकरानंच बनविली अश्लील क्लिप, शेजाऱ्यानं केला बलात्कार!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 09:24

वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. यातील एक तरुण हा पीडित मुलीचा प्रियकर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

राज ठाकरेंची नवी मागणी, अटक वॉरंट रद्द

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 13:16

ऑक्टोबर, २००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतिय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे आज वांद्रे कोर्टात हजर राहिले. त्यानंतर त्यांच्यावर बजावण्यात आलेलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं. दरम्यान, राज यांनी नवी मागणी केलेय.

राज ठाकरे हाजिर हो!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 11:27

२००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांना आज वांद्रे कोर्टात हजर रहावं लागणार आहे.

अॅसिड हल्ला : अखेर प्रीतीची मृत्यूशी झुंज संपली

Last Updated: Saturday, June 1, 2013, 17:01

गेल्या महिन्यात वांद्रे टर्मिनसवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अवघ्या २३ वर्षांच्या प्रीती राठी हिचा अखेर मृत्यू झालाय.

प्रीतीची आर्तता, `मला आता सुंदर दिसायचं नाही...`

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 12:45

वांद्रे इथे ज्या तरुणीवर अॅसिड हल्ला झाला त्या प्रीती राठीनं एक पत्र लिहिलंय. तिची प्रकृती ठीक असली तरी तिनं चेहरा गमावलाय. प्रीतीनं लिहिलेल्या पत्रात तिची आर्त व्यथा मांडलीय.

वांद्रे टर्मिनसवर दोघा तरुणींवर अॅसीड हल्ला

Last Updated: Thursday, May 2, 2013, 15:47

मुंबईतल्या वांद्रे रेल्वे टर्मिनसमध्ये दोन तरुणींवर अॅसीड हल्ला करण्यात आलाय. हल्ला झालेल्या तरुणी दिल्लीच्या राहणा-या आहेत. हे कुटुंब दिल्लीतून मुंबईत आलं होतं.

वांद्र्यात रंगला तरुणीच्या आत्महत्या नाट्याचा थरार!

Last Updated: Saturday, March 9, 2013, 09:14

मुंबईतल्या वांद्रे भागात शुक्रवारी रात्री उशिरा नीतू धारिया या सतरा वर्षांच्या तरुणीनं आत्महत्या करण्याची धमकी देत साऱ्या परिसराला वेठीस धरलं.

मुंबईतील वांद्रे येथे आगीत १५० झोपड्या खाक

Last Updated: Thursday, March 7, 2013, 14:54

वांद्रे भागातील शास्त्रीनगर झोपडपट्टीत बुधवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीत १५० झोपड्या जळून खाक झाल्यात तर १५ जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी तैनात पोहोचल्या. मात्र, आग पहाटे आटोक्यात आणण्यात यश आले.

सलमान करतोय मुंबईच्या `भूमिपुत्रांना` बेघर!

Last Updated: Sunday, March 3, 2013, 16:41

सलमान खानची ‘बॅड बॉय’ इमेज पुन्हा एकदा पुढे आली आहे. सलमान खानवर आणि त्याच्या सुरक्षारक्षकांवर मच्छीमारांना धमकावण्याचा, मारहाण केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच सलमान खानने मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान केल्याचा आरोपही त्याच्यावर होत आहे.

वांद्र्यामध्ये दुकानांची तोडफोड

Last Updated: Monday, December 5, 2011, 02:56

मुंबईतील वांद्रे भागातल्या 'गेट गॅलेक्सी हॉल'बाहेर काही अज्ञात लोकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. अज्ञातांनी सिनेमा हॉलसमोर असलेल्या दुकांनांचीही तोडफोड केली. तसंच सिनेमांची पोस्टर्सही फाडली.