Last Updated: Saturday, December 21, 2013, 12:53
www.24taas.com, झी मीडिया, पुणेअभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा तुरूंगाबाहेर आलाय. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. त्यावरुन बराच वादही झाला होता. मात्र त्यानंतरही आज पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून संजय दत्त आज बाहेर पडलाय.
संजयची पत्नी मान्यताची प्रकृती ठिक नसल्यामुळं त्याला पॅरोल देण्यात आलाय. त्यामुळं आता ख्रिसमस आणि न्यू ईयर पार्टी संजूबाबाला आपल्या घरी करता येईल. संजयला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला असला तरी फर्लोप्रमाणं ही रजादेखील वाढवता येते. त्यामुळं त्याला आताही एकूण २ महिने घरी राहता येऊ शकतं.
एकूणच त्याचा प्रवास शिक्षामाफीच्या दिशेनं सुरू आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पत्नी मान्यताची तब्येत बरी नसल्याच्या कारणावरुन संजय दत्तला ३० दिवसाची पॅरोलची रजा मंजूर झाली होती.
संजय दत्तच्या पॅरोलवर विविध स्तरातून टीका झाली होती. त्यातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या पॅरोलची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काय झाली, हे कळायचा आतच आज संजूबाबा जेलबाहेर पडलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 21, 2013, 12:53