आमिर खान `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत, `Satyamev Jayate` to the problem of Aamir Khan

आमिर खान `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत

आमिर खान `सत्यमेव जयते`मुळे  अडचणीत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता आमीर खान त्याच्या `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सिझनमधील पहिल्याच भागात त्याच्याकडून न्यायप्रविष्ट खटल्याबाबत भाष्य केल्याने न्यायालयाचा अवमान केल्याचे संकट येऊ शकते. तसे कायदे तज्ज्ञांचे मत आहे.

आमीरने `सत्यमेव जयते`च्या पहिल्या भागात एका महिलेवरील अत्याचाराच्या खटल्याबाबत चर्चा केली. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कार्यक्रमात दाखवलेल्या प्रकरणानुसार, या खटल्यातील आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे. त्यामुळे सत्र न्यायालयात या खटल्याचा निर्णय झालेला नाही. न्यायप्रविष्ट खटले सार्वजनिकरित्या एका कार्यक्रमात दाखवणे चुकीचे असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशा न्यायप्रविष्ट खटल्यांबाबत भाष्य करणे किंवा कोणत्याही कार्यक्रमातून चर्चा करणे चुकीचे आहे. त्याचा खटल्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. या खटल्याचा निर्णय लागल्यावर त्यातील पैलूंबाबत भाष्य करता येऊ शकते, असे मत कायदे तज्ज्ञांचे आहे. त्यामुळे आमिर खान अडचणीत येण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 15:54


comments powered by Disqus