Last Updated: Sunday, July 14, 2013, 08:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडमध्ये नवोदित अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या अनुष्का शर्मानं आपल्या करिअरची सुरुवात शाहरुखबरोबर केली होती. हे आपल्याला माहितच आहे. आता, ‘पवित्र रिश्ता’मधली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे हिदेखील शाहरुखसोबतच बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल ठेवणार असं दिसतंय. कारण, खुद्द शाहरुखनंच ‘हॅप्पी न्यू इअर’साठी फराह खानकडे अंकिताचं नावाची वर्णी लावलीय.
सुशांत सिंग रजपूतशी प्रेमसंबंधात असलेली अंकिताला शाहरुखनं नुकतंच मकाऊमध्ये आयफा अॅवॉर्डच्या निमित्तानं पाहिलं होतं. त्यानंतर शाहरुखनं फराह खानकडे ‘हॅप्पी न्यू इअर’तल्या मराठमोळ्या मुलीच्या भूमिकेसाठी अंकिताचं नाव सुचवलंय. शाहरुख या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
फराहनं याआधी या भूमिकेसाठी कतरिना कैफसारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचा विचार केला होता. पण, शाहरुखनं अंकिताला मकाऊमध्ये पाहिलं आणि त्याला अंकिताच या भूमिकेसाठी परफेक्ट महाराष्ट्रीयन मुलगी वाटली.
‘झी टीव्ही’वर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या डेली सोपमधून घराघरांत दाखल झालेल्या २८ वर्षांच्या अंकितानं अर्चना मानव देशमुख या नावानं टिव्हीवर अनेक वर्ष आपली छाप सोडलीय. सुशांतनं या मालिकेत अर्चनाच्या पतीची म्हणजेच मानवची भूमिका काही वर्ष निभावली होती. त्यानंतर ‘काय पो छे…’द्वारे त्यानं बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री घेतलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, July 14, 2013, 08:59