Last Updated: Monday, August 12, 2013, 08:16
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईकिंग खान शाहरुखसाठी यंदाची ईद डबल सेलिब्रेशनची ठरलीय. ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमाला रसिकांनी डोक्यावर घेतलंय. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिली तर येत्या तीन दिवसांत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल असंच चित्र सध्या दिसू लागलंय.
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख-दीपिका स्टारर ही ‘चेन्नई एक्स्प्रेस’ अशी काही सुसाट सुटलीय की, तिनं सलमान खानच्या ‘एक था टायगर’चा रेकॉर्ड मोडलाय. सलमानच्या ‘एक था टायगर’ने ओपनिंगला 30.72 कोटींचं कलेक्शन केलं होतं.
मात्र, शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं ओपनिंगलाच तब्बल 33 कोटींचं कलेक्शन केलं. तर शनिवारीही 28 कोटींचं कलेक्शन ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं केलंय. तेव्हा सलमानप्रमाणंच शाहरुखलाही ईद लकी ठरतेय, असंच म्हणावं लागेल.
शाहरुखही आपलं यश सेलिब्रेट करतोय. सेलिब्रेशनसाठी शाहरुखनं मन्नतवर जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी बॉलिवूडच्या तमाम सेलिब्रिटींनी या पार्टीला आवर्जून हजेरी लावली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 11, 2013, 23:52