Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:08
www.24taas.com, मुंबईमायानगरीचं अर्थात बॉलीवुड आणि झगमगत्या दुनियेचं आकर्षण सा-यांनाच असतं. त्यात बॉलीवुडचा किंग खान शाहरुखचे तर कोट्यवधी चाहते. मात्र शाहरुखच्या भेटीसाठी दोन अल्पवयीन मुलींनी हरियाणातून घरातून पलायन केल्याची घटना घडलीय.
किंग खानचा जब तक है जान सिनेमा या दोघींनी पाहिला आणि त्याच्या भेटीसाठी घर सोडलं... त्यासाठी एकीनं घरातून पैसेही चोरले. हरियाणातून दिल्लीमार्गे मुंबई सेंट्रलला पोहचल्या... या दोन अल्पवयीन मुलींपैकी एक अपंग आहे.. बडोद्याच्या एका प्रवाशाला या दोन मुलींवर संशय आल्यानं त्यानं याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या मुलींना डहाणू स्टेशनवर उतरवलं आणि त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.शाहरुखच्या भेटीची आस आणि सिरीयलमध्ये काम करण्याच्या इच्छेनं घरातून पळाल्याचं या अल्पवयीन मुलींनी सांगितलंय.
First Published: Sunday, March 10, 2013, 15:52