शाहरुख 'लीलावती'मध्ये दाखल..., Shah Rukh Khan to undergo shoulder surgery in Mumbai hospital

शाहरुख 'लीलावती'मध्ये दाखल...

शाहरुख 'लीलावती'मध्ये दाखल...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शाहरुख खान नुकताच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालाय. खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त झालेल्या शाहरुखवर आज लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेले सहा महिने शाहरुख बिझी शेड्युलमुळे ही शस्त्रक्रीया पुढे ढकलत होता.

‘रा-वन’ या त्याच्या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतरही शाहरुखनं हे दुखणं अंगावर काढलं तसंच शुटींग सुरुच ठेवलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुखला ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या शुटींगच्यावेळीही या दुखापतीनं चांगलाच त्रास दिला. मध्यंतरी शाहरुख लंडनला जाऊन खांद्यावर सर्जरी करुन घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज लीलावती रुग्णालयात डॉ. संजय देसाई त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत. शाहरुखच्या डाव्या खांद्यावरही यापूर्वी मुंबईच्या ब्रीच कँन्डी हॉस्पीटलमध्ये एक शस्त्रक्रीया करण्यात आली होती.

शस्त्रक्रियेनंतर काही दिवस शाहरुखला हॉस्पीटलमध्येच काढावे लागणार आहेत. त्याला पूर्णत: बरं होण्यास जवळपास एक महिना तरी लागेल. ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘आयपीएल-६’ संपल्यानंतर शाहरुखला आता वेळ मिळालाय. यावेळेत त्यानं ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतलाय.

First Published: Tuesday, May 28, 2013, 14:49


comments powered by Disqus