अबब! त्याच्या पोटात नाणी, ब्लेड, ब्रश आणि पॉलिथीन

Last Updated: Saturday, June 14, 2014, 14:04

लहान मुलांच्या पोटातून अनेकदा सुई, नाणे, सेफ्टी पिन अशा अनेक वस्तू डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढल्याचे आपण अनेकदा ऐकले असेलच. पण, अकोल्यातील घटना ऐकून तुम्हाला कुतूहल तर वाटेलच पण धक्काही बसेल. अकोल्यात एका रुग्णाच्या पोटातून चक्क 23 नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथीनची पिशवी निघालीय.

अनुष्काच्या `लिप जॉब`वर संतापला विराट!

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 16:25

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात काहीतरी शिजतंय, असं अनेकदा उघड झालंय. आता, तर विराटनं याबद्दल काहीही न बोलताही याची धडधडीत कबुलीच देऊन टाकलीय.

मृत्यूंजय : अवघ्या २८व्या वर्षी पचवल्या आठ बायपास!

Last Updated: Friday, January 24, 2014, 20:34

वय वाढलं की, साधारणपणे हृदयरोगाचा धोकाही वाढतो, मग बायपास सर्जरी करावी लागते... परंतु, नाशिकच्या एका तरूणावर २८ व्या वर्षीच बायपास सर्जरी करावी लागलीय. तीदेखील तब्बल आठ वेळा... एवढ्या बायपास सर्जरी करणारा हा नाशिककर कदाचित जगातील सर्वांत तरूण पेशंट असावा.

ऐकलंत का... आता होऊ शकतं गर्भाशय प्रत्यारोपण!

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 16:16

स्वीडनमध्ये नऊ महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, या महिला लवकरच गर्भवती होण्याची आशा बाळगून असल्याचं ही वैद्यकीय किमया साध्य करणार्यान चमूच्या प्रमुख डॉक्टरांनी जाहीर केलंय.

फ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!

Last Updated: Monday, December 23, 2013, 09:20

जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.

विनामूल्य ऑपरेशन्स करणारे २२ देवदूत!

Last Updated: Sunday, October 6, 2013, 08:41

इंग्लंडहून आलेले 22 डॉक्टर सध्या औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात मोफत प्लास्टीक सर्जरी करत आहेत. आतापर्यंत 85 मुलांच्या ओठांचं आणि टाळूचं विनामूल्य ऑपरेशन या डॉक्टर्सनी केलंय..

भारतात प्रथमच गुगल ग्लासने शस्त्रक्रिया

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 17:09

जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच डॉक्टरांनी गुगल ग्लासचा वापर करून दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. चेन्नईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

सुशील कुमार शिंदे ब्रीच कँडीत, आज शस्त्रक्रिया

Last Updated: Sunday, August 4, 2013, 10:45

केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हृतिक रोशनची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी

Last Updated: Sunday, July 7, 2013, 22:26

अभिनेता हृतिक रोशनवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ब्रेन सर्जरी करण्यात आलीय. ही सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्याचं हृतिकवर सर्जरी करणारे डॉक्टर बि. के. मिश्रा यांनी सांगितलंय..

हृतिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया, फेसबूकवर दिला मॅसेज!

Last Updated: Sunday, July 7, 2013, 15:53

अभिनेता हृतिक रोशनवर आज ब्रेन सर्जरी करण्यात येणार आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृतिकला दाखल करण्यात आलं असून डॉक्टर बि. के. मिश्रा हृतिकची सर्जरी करणार असल्याचं समजतंय.

धडापासून वेगळा झालेला हात त्यानं पुन्हा मिळवला!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 16:10

अपघात झाल्यानंतर अर्थातच सगळेच गडबडून जातात. पण, प्रसंगावधान राखून तातडीनं उपचार मिळाला तर प्रसंगी प्राण आणि गमावलेले अवयवही परत मिळवू शकतात, हे दिल्लीतील एका घटनेनं सिद्ध केलंय

शाहरुख 'लीलावती'मध्ये दाखल...

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 14:52

शाहरुख खान नुकताच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालाय. खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त झालेल्या शाहरुखवर आज लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

कॅन्सर टाळण्यासाठी स्तनांवर शस्त्रक्रिया, अॅन्जेलिनाचं धाडसी पाऊल

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 13:36

अँजेलिना जोली या हॉलिवूडच्या प्रसिद्ध नायिकेनं जगभरातल्या स्त्रियांसमोर एक आदर्श घालून दिलाय. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका आहे, हे लक्षात आल्यानंतर तिनं आपले दोन्ही स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकलेत.

मनीषा कोइरालाची कॅन्सरवर मात

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 17:33

कॅन्सरशी झगडत असणाऱ्या अभिनेत्री मनीषा कोइरालाची न्यू यॉर्कमध्ये यशस्वी सर्जरी झाली असून आता ती कॅन्सरमधून बचावली आहे.

न्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...

Last Updated: Thursday, December 6, 2012, 15:08

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गुरुवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही माहिती मनीषाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.

नील आर्मस्ट्रांग यांच्यावर ह्रद्य शस्त्रक्रिया

Last Updated: Thursday, August 9, 2012, 16:06

चंद्रावर पहिल्यांदा आपला पाय रोवणाऱ्या नील आर्मस्ट्रांग यांच्या ह्रद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आलीय. 82 वर्षांचे नील आर्मस्ट्रांग हे शस्त्रक्रियेनंतर सध्या आराम करत आहेत.

रोबोने केली हद्यरोगाची शस्त्रक्रिया

Last Updated: Sunday, August 5, 2012, 13:24

जन्मजात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या २९ वर्षीय नीलेश या तरुणावर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये रोबोच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

राजनी सोडला नि:श्वास, शस्त्रक्रिया यशस्वी

Last Updated: Friday, July 20, 2012, 14:00

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वीरित्या अँन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टीनंतर बाळासाहेबांनी उद्धव यांची फोनवरून विचारपूस केली. उद्धव यांना रविवारपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी माहिती आहे.

अखेर जुळ्या बहिणींची सुटका...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 15:09

मध्यप्रदेशातील बैतूल इथं स्तुती आणि आराधना या जुळ्या बहिणांना जणू काय दूसरं जीवनच मिळालंय. जन्मापासूनच एकमेकांना जोडल्या गेलेल्या या बहिणींना वेगळं करण्यासाठी 23 डॉक्टरांना तब्बल 12 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागलेत.

अमिताभ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Last Updated: Saturday, February 11, 2012, 16:07

हिंदी चित्रपट सृष्टीतील बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली. अमिताभ (६९) गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत.

'बिग बी'ला झालेय तरी काय?

Last Updated: Thursday, February 9, 2012, 19:43

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर येत्या ११ तारखेला पोटाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लिलावती रुग्णालयात त्याचं चेकअप करण्यात आलं. 'कुली' सिनेमादरम्यान पोटात झालेल्या दुखापतीमुळेच ही शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याचं अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटलं आहे.

मुलाची हूल, निवडणुकीतून गूल; म्हणे, 'डॉक्टरचीच भूल'!

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 07:59

महेंद्र दुधे निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारीही सुरू केली होती. मात्र तिसरं अपत्य झाल्यानं त्यांची गोची झाली, तेव्हा तिसऱ्या अपत्याचं खापर त्यांनी चक्क डॉक्टरवरच फोडलंय.