Last Updated: Thursday, June 12, 2014, 14:20
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. या दोघांच्या अफेअर आणि ब्रेक अपच्या चर्चानंतर अनेक वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.
इश्किया आणि डेढ इश्किया सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या अभिषेक चौबे आता एक ‘सायन्स नॅच्युरल थ्रिलर’ सिनेमा बनविण्याच्या तयारीत आहे. या सिनेमाचं नाव ‘उडता पंजाब’ असू शकतं, अशीही जोरदार चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमासाठी सिनेमाचा दिग्दर्शक असणाऱ्या अभिषेकनं मुख्य अभिनेता म्हणून शाहिद कपूरला कास्ट करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच या सिनेमात शाहिदसोबत प्रियांका चोप्राला घेण्याची अभिषेकचीही इच्छा आहे.
महत्त्वाचं म्हणजे, शाहिद कपूर आणि प्रियांकानं यापूर्वी ‘कमीने’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ या सिनेमांत एकत्र काम केलंय. या सिनेमाची निर्मिती विशाल भारद्वाज करणार आहे. या सिनेमाविषयी अधिकृतरित्या मात्र अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 14:20