Last Updated: Tuesday, October 16, 2012, 20:25
www.24taas.com, मुंबईसैफ अली खान आणि करीनाच्या लग्नाला अवघं बॉलिवूड लोटलं होतं. अगदी सैफ अली खानची माजी घटस्फोटित पत्नी अमृता सिंगदेखील करीनाच्या संगीत सोहळ्याला हजर होती. सैफीनाच्या जोडीला सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या. अगदी शाहिद कपूरनेसुद्धा...
पत्रकार परिषदेत बोलताना शाहिद कपूरनेही वधू-वरांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी तो म्हणाला, “मी सैफ आणि करीनाला लग्नाच्या शुभेच्छा देतो. मी रणधीर कपूर यांनाही शुभेच्छा देऊ इच्छितो. मुलीचं लग्न ही आयुष्यातली खूप मोठी गोष्ट असते.”
तसंच करीनाच्या या माजी-प्रियकराला अशीही आशा आहे, की करीना लग्नानंतरही सिनेमात काम करत राहील. “मी आशा करतो, की करीना लग्नानंतरही सिनेमात काम करत राहील. सध्याच्या घडीला सिनेमा इंडस्ट्रीतली ती एक सर्वोत्तम अभिनेत्री आहे.”
मात्र शाहिदला लग्नाचं आमंत्रण होतं का या प्रश्नावर शाहिद लज्जित होऊन म्हणाला, “आमंत्रण मिळालं की नाही, यावर मी काय बोलू!!”
First Published: Tuesday, October 16, 2012, 20:25