Last Updated: Wednesday, May 21, 2014, 13:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला सध्या ‘सिंगल’ या शब्दाचा फारच कंटाळा आलेला दिसतोय... म्हणूनच की काय ‘सिंगल... हू इज रेडी टू मिंगल’ असं म्हणणारा शाहिदचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलेलं दिसलं. पण, प्रत्येक वेळेस गाडी काही पुढे सरकली नाही.
आत्ताआत्तापर्यंत शाहिद आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यात मैत्रीपेक्षाही अधिक जवळचं नातं निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं... गेल्याच आठवड्यात शाहिद सोनाक्षीसोबत एका पार्टीमध्ये दिसला... यानंतर दोन दिवसांनी तो जॅकलिन फर्नांडिस हिच्यासोबत डिनर करताना आढळला. यानंतर, शाहिद त्याची मैत्री मीनल हिच्यासोबत एक सिनेमा एन्जॉय करताना दिसला... आणि अलगद मीडियाच्या कॅमेऱ्यातही कैद झाला.
पण, शाहिदची ही लिस्ट काही संपायचं नाव घेत नाही... एका वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, सध्या शाहिद कपूरला शक्ती कपूरची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासोबत वेळ व्यतीत करणं आवडू लागलंय.
श्रद्धा कपूर ‘आशिकी - 2’ फेम आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याचं एव्हाना अनेकांना माहित झालंय... दोघं काही दिवसांपूर्वी सुट्टीत यूएसलाही गेले होते. ही गोष्ट शाहिदला माहित नसणं अशक्यचं... पण, तरीदेखील त्याला पर्सनल लाईफमध्ये श्रद्धाचा एका चांगला मित्र बनायची इच्छा आहे.
श्रद्धा आणि शाहिद ‘हैदर’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. श्रद्धाचं म्हणाल तर आपल्या सहअभिनेत्यासोबत तिला सेटच्या बाहेर कोणतेही पर्सनल रिलेशन ठेवण्यात इंटरेस्ट नाही... आता, शाहिदची ही मैत्री किती दिवस टिकतेय हेही लवकरच समोर येईल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 21, 2014, 13:03