रात्री एक वाजता... शाहरुख आणि बोमन एकाच व्हॅनमध्ये, shahrukh & boman irani... at 1 am... playing vid

रात्री एक वाजता... शाहरुख आणि बोमन एकाच व्हॅनमध्ये...

रात्री एक वाजता... शाहरुख आणि बोमन एकाच व्हॅनमध्ये...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा सह-कलाकार बोमन इराणीसोबत सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. पण, दोघांचं ‘व्हिडिओ गेम प्ले स्टेशन – ४’ चे कट्टर फॅन आहेत.

आपलं काम आणि कुटुंब आपल्या आणि व्हिडिओ गेमच्या प्रेमाच्या आड येऊ नयेत, याचीही ते पुरेपूर काळजी घेतात. ‘हॅपी न्यू इअर’ची दिग्दर्शक फराह खान हिनं त्यांची ही पोलखोल केलीय तीही सोशल वेबसाईटवर... हा खुलासा करण्यासाठी फराहनं ट्वीटरला निवडलंय.

फराहनं सोमवारी मायक्रोब्लॉगिंग साईटवर लिहिलं, ‘रात्रीचा एक वाजलाय आणि आम्ही आत्ताआत्ताच शूटींग संपवलंय. पण ८.३० वाजताच आपलं काम संपवणाऱ्या शाहरुख खान आणि बोमन इरानी आत्ताही व्हॅनमध्ये पीएस-४ खेळत आहेत’.

फराह खानच्या ‘हॅप्पी न्यू इअर’ या कॉमेडी सिनेमात अभिनेता सोनू सूद आणि अभिषेक बच्चन हेदेखील आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 23, 2013, 16:38


comments powered by Disqus