Last Updated: Monday, August 12, 2013, 17:49
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईशाहरुख-दीपिकाचा लुंगी डांस सध्या सगळीकडे धूम माजवतोय. लुंगी डांसचा प्रभाव इतका झालाय की, महेंद्रा ग्रृपचे अध्यक्ष आनंद महेंद्रा हे आपल्या घरी आता लुंगी घालून आराम करतांना दिसतायेत. दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांतच्या सन्मानार्थ दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आपल्या चित्रपटात या लुंगी डांस अंतर्भूत केला.
‘चेन्नई एक्स्प्रेस’चं हे लुंगी डांसचं गाणं गायलंय गायक हनी सिंह यानं. आतापर्यंत या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली असून गाण्याला यू-ट्यूबवर आतापर्यंत १५ लाख हीट्स मिळाल्या आहेत.
महेंद्रा यांनी ट्विटरवर या गाण्याबद्दल प्रतिक्रिया देत, लुंगीला एवढं कूल लूक दिल्याबद्दल रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत. शिवाय शालेय दिवसानंतर आपण आता घरी लुंगी घालत असल्याचं महेंद्रा म्हणाले. त्यामुळं मुलं मला ‘स्कर्ट वाला स्कॉट निवासी’ असं बोलू लागल्याचंही महेंद्रा म्हणाले. चित्रपटातल्या गाण्यात शाहरुख आणि दीपिकानं लुंगी घालून डांस केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, August 12, 2013, 17:49