Last Updated: Friday, November 22, 2013, 08:57
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगुरूवारचा दिवस अग्नितांडवाचाच दिवस ठरलाय... बॅक बे आगार जवळील आंबेडकरनगर झोपडपट्टी, एल अँड टीचं इमर्जन्सी प्लांट सोबतच किंग खान शाहरुखच्या `मन्नत` या बंगल्यात ही आग लागली. लवकरच ही आग आटोक्यात आली. त्यामुळं सुदैवानं आगीत कोणालाही हानी झालेली नाही.
आग लागली त्यावेळी शाहरुख खानसह त्याचं सगळं कुटुंब बंगल्यात उपस्थित होतं. आग लागल्यानंतर फायर अलार्म वाजला आणि त्यानंतर शाहरुखनं याची माहिती अग्निशमन दलाला दिली. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची माहिती मिळालीय. आगीनंतर संपूर्ण `मन्नत` अंधारात होतं.
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर ही आग विझवण्यात आली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 08:57