शाहरुख खानच्या `मन्नत`मधील आग आटोक्यात

Last Updated: Friday, November 22, 2013, 08:57

गुरूवारचा दिवस अग्नितांडवाचाच दिवस ठरलाय... बॅक बे आगार जवळील आंबेडकरनगर झोपडपट्टी, एल अँड टीचं इमर्जन्सी प्लांट सोबतच किंग खान शाहरुखच्या `मन्नत` या बंगल्यात ही आग लागली. लवकरच ही आग आटोक्यात आली. त्यामुळं सुदैवानं आगीत कोणालाही हानी झालेली नाही.