किंग खान शाहरुख करणवीर पुढं झुकला Shahrukh Khan say`s sorry to TV actor Karanveer Bohra for his car

किंग खान शाहरुख करणवीर पुढं झुकला

किंग खान शाहरुख करणवीर पुढं झुकला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडचा बादशहा जितका फटकळ स्वभावाचा समजला जातो तेवढाच तो दिलदार सुद्धा आहे, हे नुकतंच एका प्रकरणावरून पुढं आलंय. किंग खाननं चक्क करणवीर व्होराची क्षमा मागितलीय.

त्याचं घडलं असं की शाहरुखच्या `व्हॅनिटी व्हॅन`नं टीव्ही अॅक्टर करणवीर बोहराच्या कारला धडक दिली. यात शाहरूखच्या चालकाची चूक होती. या अपघाताच करणवीरच्या कारचं मोठं नुकसान झालं. करणवीरसारख्या कलावंतासाठी हे नुकसान खूप मोठं होतं. विशेष म्हणजे या अपघाताचा शाहरुखला देखील पश्‍चात्ताप झाला. त्यानं बोहराला सर्व नुकसानभरपाई दिली.

करणवीरची अपघातग्रस्त कार दुरुस्त होईपर्यंत शाहरुखनं त्याला स्वत:ची कार वापरण्यास दिली. याबरोबरच किंग खानसह त्याच्या ड्रायव्हर आणि मॅनेजरनेदेखील करणवीरची माफी मागितली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 08:49


comments powered by Disqus