Last Updated: Tuesday, December 18, 2012, 12:40
www.24taas.com, मुंबई आपला आगामी सिनेमा ‘हॅप्पी न्यू इयर’ बाबतीत मीडियामधून लोकांसमोर येणाऱ्या बातम्यांबद्दल किंग खान खूपच नाराज झालाय. आपला हा राग त्यानं सोशल वेबसाईटच्या माध्यमातून लोकांसमोर व्यक्त केलाय.
`हॅपी न्यू इयर` या सिनेमात अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राला पहिली पसंती दिली जावी यासाठी शाहरुख खान सिनेमाची दिग्दर्शिका फराह खान हिच्यावर दबाव टाकत असल्याच्या काही बातम्या आल्या होत्या. याच बातम्यांमुळे शाहरुख नाराज झालाय.
‘या सर्व बातम्यांमध्ये काहीही अर्थ नाही. जेव्हा व्यक्तीच्या शब्दांमध्ये आणि शारिरीक हालचालींमध्ये संतुलन नसतं तेव्हा त्याचा अर्थ असतो की तो खोटं बोलतोय. आजकालच्या टॅब्लॉईडची भाषा आणि हेडलाईन्स याच प्रकारच्या असतात. त्या बातम्यांमध्ये वापरले जाणारे शब्द त्यांची सत्यता सांगतात’ असं म्हणत शाहरुखनं आपल्या रागाला वाट मोकळी करून दिलीय.
एकूणच काय तर गेल्या काही दिवसांपासून शाहरुख-प्रियांकाची वाढती जवळीक आणि शाहरुखच्या तोंडी प्रियांकाचं तोंडभरुन कौतूक याचा मीडियालाही लळा लागलेला दिसतोय.
First Published: Tuesday, December 18, 2012, 12:40