प्रियांकानंतर शाहरुख आता परिणीतसोबत... shahrukh khan with pariniti chopra in happy new year

प्रियांकानंतर शाहरुख आता परिणीतीसोबत...

प्रियांकानंतर शाहरुख आता परिणीतीसोबत...
www.24taas.com, मुंबई

शाहरूख खान-प्रियांका चोप्राच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली. लवकरच शाहरुख प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राबरोबरही झळकणार असल्याची चर्चा रंगतेय.

‘हॅप्पी न्यू इअर’ हा फराह खानचा आगामी चित्रपट... या चित्रपटात शाहरुख आणि परिणीती एकत्र दिसणार असल्याचं समजतंय. परिणीतीने ‘लेडीज वर्सेस रिकी बेहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकलं. पण, त्यानंतर आलेल्या ‘इश्कजादे’मुळे तिला नवी ओळख प्राप्त झालीय. आणि आता तर शाहरूखसोबत काम केल्यानंतर तिच्या करिअरला चांगलीच गती प्राप्त होईल, असं दिसतंय.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘इश्कजादे’नं बॉक्सऑफिसवर एकच धम्माल उडवून दिली होती. यामध्ये परिणीतीच्या अभिनयाचं तोंड भरून कौतूकही झालं. त्यानंतर परिणितीला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. फराहासुध्दा आपल्या ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होती आणि तिला हवाय तसा चेहरा परिणीतीच्या रुपानं तिच्यासमोर उभा राहिला. ही गोष्ट फराहानं अजून जाहीर केली नसली तरी बॉलिवूडमध्ये कोणती गोष्ट लपून राहते? शाहरुख आणि परिणीतीच्या जोडीचा विचारही फराहाच्या डोक्यात आहे.

परिणीती अगोदर फराहा विद्या बालनला चित्रपटात घेण्यासाठी इच्छुक होती पण विद्याचं वाढलेलं वजन पाहून फराहाला तोंडात बोट घालावं लागलं. फराहाला ‘हॅप्पी न्यू इअर’मधली हिरोईन मादक आणि कमी वयाची मुलगी आहे. त्यामुळे तिनं परिणीतीला फिक्स केलंय. आता सगळ्यांना उत्सुकता लागलीय ती याची, की शाहरुख हा सिनेमा स्वीकारणार की नाही?

First Published: Wednesday, October 17, 2012, 13:40


comments powered by Disqus