Last Updated: Wednesday, October 16, 2013, 17:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडच्या तारे तारकांचे चाहते जगभर पसरले असून त्याचा प्रत्यय बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि धकधक गर्ल माधुरी यांना ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडमध्ये आला. शाहरुखच्या ‘टेम्प्टेशन रिलोडेड’ या शो दरम्यान शाहरुख-माधूरी या जोडीला पाहून त्यांच्या चाहत्यांना आकाश ठेंगणं झालं होतं.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान जे काही करतो ते अत्यंत दिमाखदार असतं. त्यामुळेच त्याला बॉलिवूडचा किंग खान म्हटलं जातं. केवळ सिनेमाच नाही तर स्टेज शोमध्येही किंग खानला तोड नाही. ‘टेम्प्टेशन रिलोडेड’ या आपल्या स्टेज शो दरम्यान किंग खानचा स्टेजवर जलवा पहायला मिळाला. यंदा शाहरुखने आपलं कॉन्सर्ट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केलं होतं. खरं तर स्वत: शाहरुख खान हाचं त्याच्या स्टेज शोचं आकर्षण असतो. पण यावेळी त्याच्या सोबतीला होता देसी रॅपर हनी सिंग... हनी सिंगच्या गाण्याचे दिवाने परदेशातही पसरले असल्याचं या स्टेज शोच्या निमित्ताने पहायला मिळालं. हनी सिंगच्या गाण्यावर चाहते मनसोक्त थिरकले. हनी सिंगमुळे ‘टेम्प्टेशन रिलोडेड’ची शान वाढल्याची खुद्द शाहरुखने कबुली दिली. हनी सिंगच्या धमाकेदार परफॉरमन्सला प्रेक्षकांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला तर किंग खानचा रोमॅन्टिक अंदाज हिट झाला. या स्टेज शो दरम्यान शाहरुखला साथ दिली माधुरी दिक्षित,राणी मुखर्जी आणि जॅक्लिन फर्नांडिस या तीन अभिनेत्रींनी... शाहरुखसोबत त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. यावेळी, धकधक गर्ल माधुरीनं आपण आजही शाहरुखच्या आदांवर फिदा असल्याचं म्हटलंय.
चेन्नई एक्प्र्सेच्या यशामुळे शाहरुखचा जोश वाढला असून त्यामुळेच तो आपल्या फॅन्सला ‘टेम्प्ट’ करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या-ज्या ठिकाणी शाहरुख चा हा स्टेज शो झाला ते प्रत्येक शहर शाहरुखच्या रंगात रंगलं होतं. शाहरुखला सिनेमासोबतच स्टेज शो करायला आवडतो. फॅन्समुळेच आपण ‘बॉलिवूडचा बादशाह’ असल्याची शाहरुखला चांगलीच कल्पना असून त्यामुळेच त्याचा प्रत्येक जण दिवाना आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, October 16, 2013, 17:39