Last Updated: Wednesday, December 18, 2013, 12:10
www.24taas.com, झी मिडिया, मुंबई सिने जगतातला जगातला प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार... आतापर्यंत अनेक वेळा भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालेली आहेत. पण यंदा चक्का हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘कामसूत्र थ्रीडी` ला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालंय. ऑस्कर पुरस्कारासाठी, तीन विभागांत चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत.
बेस्ट मोशन पिक्च र, ओरिजनल स्कोर आणि ओरिजनल साँग या विभागांत ही नामांकनं आहेत. या चित्रपटातील ‘हर हर महादेव`, ‘अय्यगिरी नंदिनी`, ‘सावरिया`, ‘आय फेल्ट` आणि ‘ऑफ सोईल` या पाचही गाण्यांना बेस्ट ओरिजनल साँग विभागात नामांकनं मिळाली आहेत. ही गाणी रूपेश पॉल आणि प्रत्युष प्रकाश यांनी लिहिली आहेत. तर या गाण्यांना चेन्नईतील सचिन आणि श्रीजीत यांनी संगीत दिलंय.
रूपेश पॉल यांनी ‘कामसूत्र थ्रीडी`चं दिग्दर्शन यांनी केलंय. विशेष म्हणजे या सिनेमात आपले मराठमोळे अभिनेते मिलिंद गुणाजी आणि मकरंद देशपांडे यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या विभागात २८९ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ओरिजनल साँग विभागात ७५ गाण्यांचा समावेश आहे. ओरिजनल स्कोर विभागात ११४ गाण्यांमध्ये स्पर्धा होईल.
ऑस्कर पुरस्कारासाठी जाहीर झालेली नामांकनं प्राथमिक फेरीतील आहेत. पुढील वर्षी १६ जानेवारी रोजी ऑस्कर पुरस्कारासाठीच्या अंतिम नामांकनांची घोषणा होणार आहे. ऑस्कर पुरस्काराचा अंतिम सोहळा २ मार्च रोजी होईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 18, 2013, 12:10