Last Updated: Monday, October 29, 2012, 23:07
www.24taas.com,मुंबईबिनधास्त शर्लिन चोप्रा हिने आखणी एक पाऊल पुढे टाकले आहे. याआधी तिने अॅडल्ट मॅगझीन प्लेबॉयच्या कव्हरवर न्यूड पोज दिली होती. शर्लिन आता तयार आहे ती मोठ्या पडद्यावर आग लावायला. ‘कामसूत्र’ या थ्रीडी सिनेमात ती काम करणार आहे.
‘कामसूत्र’ या सिनेमाचे दिग्दर्शन रुपेश पॉल करणार आहे. हा चित्रपट मिळवून शर्लिनने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या चित्रपटाची घोषणा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आली होती. रुपेश पॉल यांचा हा ‘सेंट ड्रॅक्युला’ नंतर दुसरा चित्रपट आहे.
पॉलने सांगितले की, शर्लिनला साइन करून खूपच खूश आहे. या भूमिकेसाठी आवश्यक असलेली सेन्श्युएलिटी तिच्यात आहे. हा चित्रपट तिच्या करियरमधील महत्वाचा सिनेमा असेल.
First Published: Monday, October 29, 2012, 23:07