Last Updated: Wednesday, November 20, 2013, 14:12
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसनची कन्या आभिनेत्री श्रुती हसनवर एका अज्ञात व्यक्तीनं तिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला आहे. हा व्यक्ती खूप दिवसांपासून श्रुतीचा पाठलाग करत होता. एक वेबसाईट ‘१२३ तेलगु डॉट कॉम’च्या बातमीनुसार २७ वर्षीय श्रुतीनं, जसा आपला दरवाजा उघडला त्यानं श्रुतीचा गळा पकडला आणि घरात शिरण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रेतल्या आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये श्रुतीच्या घरी सकाळी साडे नऊ वाजता, कोणीतरी बेल वाजवली. तिनं दरवाजा उघडताच या व्यक्तीनं तिच्या घरी घुसण्याचा प्रयत्न करून तिच्यावर हल्ला केला. श्रुती त्याला ओळख का दाखवत नाही आहे, त्याच्याशी बोलत का नाही, हे जाणून घेण्यासाठी त्यानं घरात शिरण्याचा हा प्रयत्न केल्याचं समजतंय. मात्र श्रुती या परिस्थितीला निर्भयतेनं सामोरी गेली. हल्लेखोराच्या हातावर दरवाजा मारत तिनं त्याला पिटाळून लावलं.
याबाबत तक्रार दाखल करण्याचा विचार सध्या श्रुतीनं केला नसल्याचं तिच्या जवळच्या लोकांनी सांगितलं. या प्रसंगानंतर श्रुती खूप घाबरलीय. हल्लेखोराला बरेचदा श्रुतीच्या सेटवर बघितलं गेलंय. श्रुतीनं तमिळ सिनेमांसह हिंदी सिनेमातही काम केलंय. बॉलिवूडमधील ‘लक’ आणि ‘रमैया वस्तावैया’ या सिनेमात तिनं काम केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 20, 2013, 12:40