हॉट वीणा मलिकनं कर्नाटकातलं वातावरण तापवलं, Shreeram sena doing agitation against Veena Malik`s new Kannad Film

हॉट वीणा मलिकनं कर्नाटकातलं वातावरण तापवलं

हॉट वीणा मलिकनं कर्नाटकातलं वातावरण तापवलं
www.24tass.com , झी मीडिया, मुंबई

पाकिस्तानची हॉट अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा चर्चेत आलीय. तिच्या सीननं भारतातलं वातावरण तापवलंय. सिल्क सक्कत मगा’ या कन्नड चित्रपटातल्या हॉट सीनच्या विरोधात हिंदू संघटना असलेल्या श्रीराम सेनेनं प्रदर्शन करत चित्रपटावर बहिष्कार टाकलाय.

चित्रपटातून समाजात चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा आपल्या समाज आणि संस्कृतीवर वाईट परिणाम होईल, असं श्रीराम सेनेचं म्हणणं आहे. श्रीराम सेनेनं हुबळी, बेळगाव, म्हैसूर, धारवाडसह अनेक शहरांमध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग बंद पाडलंय.

२ ऑगस्टला रिलीज झालेला हा चित्रपट रिलीजनंतर ४ दिवसांतच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. चित्रपाटाला विरोध का होतोय, हे समजत नसल्याचं म्हणत दिग्दर्शक त्रिशूलनं याबाबत दु:ख व्यक्त केलंय. वीणा मलिक या चित्रपटात बिकिनी घालून दिसलीय. शिवाय तिचे बोल्ड दृश्यही चित्रपटात असल्याचं समजतंय.

यापूर्वी वीणा मलिक बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून खूप चर्चेत आली होती. ‘सिल्क सक्कत मगा’ हा वीणाचा चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’चा कन्नड रिमेक आहे. चित्रपटात वीणा सोबतच सना खानही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 7, 2013, 11:28


comments powered by Disqus