Last Updated: Wednesday, August 29, 2012, 12:34
www.24taas.com, मुंबई‘इक्बाल’ सिनेमातून हिंदीत आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या श्रेयसचे आता दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आगामी ‘जोकर’ आणि ‘कमाल धमाल मालामाल’ या दोन्ही सिनेमांतून श्रेयसच्या धमाल विनोदी अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे.
पदार्पणातच ‘इक्बाल’, ‘वेलकम टू सज्जनपूर’ सारखे सिनेमे दिल्यामुळे श्रेयसकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र मधल्या काळात श्रेयसची जादू ओसरली होती. मात्र त्याचे सतत सिनेमे येत होते आणि त्यातील बरेच सिनेमे हिट देखील होत होते. गोलमाल सिनेमामुळे त्याला यशाची चव चाखता येत होती. या ही वर्षी त्याचा ‘हाऊसफुल्ल-2’ हा सिनेमा रिलीज झाला. अक्षय कुमार, जॉन आब्रहम यांच्यासारखे अभिनेते असूनही श्रेयसचा अभिनय लोकांना भावला. या सिनेमाने 100 कोटींचा गल्लाही जमवला.
आता श्रेयस पुन्हा धमाल करायला सिद्ध झालालय. आगामी जोकर सिनेमात तो अक्षय कुमारच्या भावाची भूमिका साकारत आहे. या सिनेमात श्रेयस एकही डायलॉग बोलला नाही. तर त्याने जिब्रीश (अगम्य) भाषा वापरली आहे. तर त्यानंतर येणारा कमाल धमाल मालामाल हा सिनेमा मालामाल वीकली या सिनेमाचा सिक्वल आहे. यात श्रेयस नाना पाटेकरसोबत दिसेल. यात श्रेयसची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे.
First Published: Wednesday, August 29, 2012, 12:34