Last Updated: Monday, September 24, 2012, 14:02
www.24taas.comविदेशात पॉर्न स्टार असलेली सनी लिऑन मुंबईत हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून दाखल झाली. तिचा पहिला सिनेमा बऱ्यापैकी चालला. मात्र तरीही सनी लिऑनला मुंबईत घर मिळणं मुश्किल झालंय. त्यामुळे तिला ‘कुणी घर देता का घर?’ असं विचारत फिरायची पाळी आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सनी लिऑनच्या पॉर्न स्टार असण्यामुले तिला घर देण्याबाबत मुंबईतीली सोसायट्या का-कू करत आहेत. त्यामुळे सनी लिऑनला मुंबईतील सोसायट्यांमध्ये भाड्यानेही राहायला जागा मित नाहीये. सोसायटींच्या सदस्यांनी भीती वाटतेय, की एका पॉर्नस्टारला घर भाड्याने राहायला दिल्यास सोसायटीवर त्याचा वाईट परिणाम होईल.
जिस्म-२ या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेली पॉर्नस्टार सनी लिऑन गेले कित्येक महिने मुंबईत घर शोधत आहे. अजूनही तिला मनासारखं घर मिळत नाहीये. आपल्या स्वप्नांचं घर मिळेपर्यंत सनी लिऑनला हॉटेलमध्ये राहाण्यापेक्षा इमारतीत राहाण्याची इच्छा आहे. मात्र मुंबईकर मात्र तिच्या पॉर्नस्टारच्या प्रतिमेला घाबरून आपल्या सोसायटीपासून तिला दूरच करू इच्छित आहेत.
First Published: Monday, September 24, 2012, 14:02