Last Updated: Thursday, November 14, 2013, 22:19
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई रिअॅलिटी शो बिग बॉस ७मध्ये दररोज नवनवी भांडणं होत आहेत. नुकतंच एजाझ खान आणि सोफिया हयात यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. यात एकमेकांबद्दल काही आक्षेपार्ह शब्दही उच्चारले गेले.
बुधवारी बिग बॉस ७मध्ये स्पर्धक काम्या पंजाबी हिने कमांडरची भूमिका निभावत असताना काही जणांना स्विमिंग पूलच्या पाण्यात हात वर करून उभं राहाण्याची शिक्षा दिली. मात्र एजाझ खान पायाला दुखापत झाल्याचं कारण देत बाहेर आला. यावर संतापून काम्याने आदेश दिला, की जर एजाझ पुन्हा पाण्यात गेला नाही, तर सगळ्यांनाच पाण्यात उभं राहाण्याची शिक्षा करण्यात येईल.
एजाझने तरीही पाण्यात जाण्यास नकार दिल्यावर सोफिया हयात संतापली. एजाझमध्ये हिंमतच नाही. तो पुरूषच नाही असं सोफिया संतापाने बोलू लागली. सतत ‘तू नामर्द आहे’ असं म्हटल्यावर एजाझचा तोल सुटला आणि तो सोफियाला “ये तुला माझी ‘मर्दानगी’ दाखवतो”, असं म्हणाला. एजाझच्या या वाक्याने घरातील महिला संतप्त झाल्या. प्रत्युषा, गौहर या सर्वांनी एजाझला अश्लील बोलल्याबद्दल सुनावलं. सोफिया एजाझच्या बोलण्याने रडू लागली. तिला गौहर शांत करण्याचा प्रयत्न करत होती. संग्राम सोफियाला एजाझला माफ करण्याबद्दल समजावत होता. मात्र सोफिया ऐकायला तयार नव्हती.
काही वेळाने आपल्या चुकची जाणीव झाल्यावर एजाझने सोफियाची माफी मागितली. आपल्या मनात तसं काही नसल्याचं म्हटलं. आता सोफिया एजाझला माफ करणार का? हे कळेलच.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 14, 2013, 22:19