सोहाचे नवे नखरे, बिकीनी घालायला मिळाली परवानगी, Soha Ali Khan in bikini show

सोहाचे नवे नखरे, बिकीनी घालायला मिळाली परवानगी

सोहाचे नवे नखरे, बिकीनी घालायला मिळाली परवानगी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खानने नाही नाही म्हणत बिकीनी घालण्यास राजी झाली खरी. मात्र, माझ्याच पसंतीची बिकीनी घालणार असे स्पष्ट दिग्दर्शकाला बजावले. दिग्दर्शकाने सोहाची ही मागणी मान्य केली. त्यामुळे दिग्दर्शकाची मागणी पूर्ण करताना आपली मागणीही मान्य करून घेतले. याला सोहाचे नखरे म्हणायचे की तिचं हे बिकनी प्रेम.

सध्या बॉलिवूडमध्ये बिकिनीची फॅशन गाजत आहे. या आधी करीना कपूर बिकीनीत दिसली आहे. तर दीपिका पदुकोणची कॉपी कॅटरिना कैफ हिने केली होती. सिनेमात बिकीनीचे दृश्य दाखविण्यावर भर दिला जात आहे. आता तर अभिनेत्री सोहा अली खान हिने मी बिकिनी कधीच घालणार नाही, असे म्हटले होते. परंतु आता सोहा बिकिनी घालणार आहे, हे स्पष्ट झाले. सोहाने निर्माता आणि दिग्दर्शकांवर बॉम्ब टाकला. मी घालीन ती माझ्या पसंतीची.

बिकिनी परिधान करेन पण माझ्या कलेक्शनची, असे सोहाने म्हटले आहे. आता याला सोहाचे नखरे म्हणायचे , की स्वतःच्या बिकिनीवरचे अतिप्रेम?. बॉलिवूडमधील करिअरमध्ये सोहाने आता बिकिनी घालायला होकार दिला आहे. दिग्दर्शकाला विनंती केल्यानंतर तिला स्वतःच्या आवडीची बिकीनी घालायला परवानगी मिळाली आहे, बरं का.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013, 18:05


comments powered by Disqus