नाही नाही म्हणणारी, सोहा बिकिनीत!,Soha will Appear in Bikini on Silver Screen

नाही नाही म्हणणारी, सोहा बिकिनीत!

नाही नाही म्हणणारी, सोहा बिकिनीत!
www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई

सोहा अली खान अखेर आई शर्मिला टागोरच्या पावलांवर पाऊल ठेऊन बिकिनी सीन देण्यास तयार झाली आहे. आजपर्यंत बिकिनीवर दृश्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोहाने आपल्या आगामी ` मिस्टर जो बी काव्‍‌र्हालो` या चित्रपटात बिकिनी सीन दिला आहे. याचीच चर्चा सध्या आहे.

वास्तविक सोहा पहिल्यांदाच बिकिनीत रूपेरी पडद्यावर दिसणार असली तरी ती या आधीही बिकिनीत कॅमेऱ्यामोर आलेली आहे. याआधी तिने एका इंग्रजी नियतकालिकासाठी बिकिनीत छायाचित्र दिले आहे. सोहाची आई शर्मिला टागोरनेसुद्धा `अॅठन इव्हिनिंग इन पॅरिस`मध्ये बिकिनीत कॅमेऱ्यासमोर येण्याचे धाडस दाखविले होते. परंतु, सोहाने मात्र `गरज नसताना उगीचच बिकिनी दृश्य देणे पटत नाही`, असे म्हणत बिकिनीला लांब ठेवले होते.

`मिस्टर जो बी काव्‍‌र्हालो` या सिनेमात आपण बिकिनी घालणार असल्याचे सोहानेच जाहीर केले आहे. टू पीस बिकिनीमध्ये तिच्यावर दृश्य चित्रित केले आहे. स्विंमीग पूलमधील या दृश्यात ती अर्शद वार्सीबरोबर असणार आहे.

सोहा बिकिनीतची पाठराखण करताना सांगते, हा विनोदी प्रसंग आहे. बिकिनी दृश्य चित्रित करण्यास आजवर माझा विरोध होता. कारण तसे दृश्य देण्याची गरज आजवर भासली नाही. या चित्रपटात स्विंमीगपूलचा सीन असल्यामुळेच बिकिनी दृश्य दिल्याचे स्पष्टीकरण सोहा देते. बिकिनी दृश्य देताना मला स्वत:ला त्यात `कम्फर्टेबल` वाटणे महत्त्वाचे आहे.

सोहा या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे एक पोलीस अधिकारी, एका दृश्यात बिकिनीत, एका दृश्यात कॅब्रे डान्सर, एका दृश्यात अप्सरा अशा वेगवेगळ्या दृश्यांमध्ये वेगवेगळ्या पोषाखात सोहा दिसणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 10, 2013, 15:16


comments powered by Disqus