Last Updated: Wednesday, April 23, 2014, 12:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोनाक्षी सिन्हा आपली फिल्मी करियरविषयी सध्या खुप उत्साहित आहे.
कारण सोनाक्षी दक्षिण भारतीय सिनेमातील स्टार रजनीकांत सोबत लवकरच शुटिंग करणार आहे. दोन्ही एका तमिळ चित्रपटात काम करणार आहेत. या सिनेमाचं शुटिंग मे महिन्यात सुरू होणार आहे.
सोनाक्षी सिन्हाने यावर म्हटलंय, इंडस्ट्रीत फार कमी लोक आहेत, ज्यांना तलाईवा म्हणजेच रजनीकांतसोबत अभिनय करण्याची संधी मिळते.
दक्षिणात्य सिनेमात माझी सुरूवात होणार असेल तर ती अशीच व्हायला हवी, मी रजनीकांत यांच्यासोबत शुटिंग सुरू करण्यासाठी उत्साहित असल्याचंही सोनाक्षीने म्हटलंय.
या चित्रपटाचं दिग्दर्शन के एस रविकुमार करणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 23, 2014, 12:27