कपाटात टॉयलेट... टॉयलेटमध्ये चोर!, SONIKA GILL HUSBAND ARREST

कपाटात टॉयलेट... टॉयलेटमध्ये चोर!

कपाटात टॉयलेट... टॉयलेटमध्ये चोर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री सोनिका गिल हिचा नवरा मितेश रुघानी याला पोलिसांनी ज्वेलरची फसवणूक आणि तब्बल ८१ लाखांच्या दागिन्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक केलीय.

मितेशनं खारच्या अदी ज्वेलरकडून ८१ लाखाचे दागिने विशिष्ट मुदतीत परत करण्याचे आश्वासन देऊन भाड्याने घेतले होते. हे दागिने त्याने परत केलेच नाही. त्यामुळे ज्वेलरने पोलिसांत लेखी तक्रार नोंदविली. त्यामुळे पोलिसांनी मितेश आणि सोनिका राहत असलेल्या घराची झाडाझडती सुरू केली. यावेळी मितेश रुघानी फरार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं सोबतच सोन्याचे दागिन्यांचा काही पुरावाही पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे हताश झालेल्या पोलिसांनी माघारी फिरण्याची तयारी केली होती. पण...

कसा आणि कुठे सापडला मितेश रुघानी...
... पण, मितेशच्या घरात टॉयलेट नसल्याची गोष्ट पोलिसांच्या ध्यानात आली. मात्र, किचनजवळ पोलिसांना एक कपाट सापडलं. दोन्ही गोष्टी पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी पुरेशा होत्या. मग काय, पोलिसांनी या कपाटाकडे आपला मोर्चा वळवला आणि सोनिका गिल हिची बोबडी वळली.

सोनिकानं पोलिसांनी हे कपाट उघडू नये, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. कपाटातल्या महागड्या कपड्यांचं आणि दागिन्यांचं नुकसान होईल, असं कारण देत तीनं पोलिसांना अडवलं. पण, पोलिसांनी तिचा विरोध न जुमानता हे कपाट उघडलं... आणि पोलिसांना मितेश सापडला.

या कपाटात एक गुप्त टॉयलेट बनवलं होतं. इथंच मितेश पोलिसांच्या भीतीनं लपून बसला होता. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. मितेशकडून २० लाखांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 8, 2013, 12:06


comments powered by Disqus