EXCLUSIVE व्हिडिओ : इराकमध्ये फसलेले भारतीय

Last Updated: Saturday, June 21, 2014, 12:06

इराकमध्ये सुरु असलेल्या यादवी युद्धात अनेक जण भरडले जात आहेत. इराकच्या बसरा शहरात नोकरीच्या शोधात गेलेल्या काही भारतीयांचाही यामध्ये समावेश आहे... याच काही इथं फसलेल्या भारतीयांचा पहिला व्हिडिओ `झी मीडिया`च्या हाती लागलाय.

महापालिकेविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 08:19

ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुंबईत ऑनलाईन गंडा, बँकेलाच १४ लाखांला फसविले

Last Updated: Saturday, March 1, 2014, 13:34

मुंबई पोलीसांनी गोरखपुरवरुन अशा एका टोळीला अटक केलीये, ज्या तरुणांच्या टोळीनं ऑनलाईन खरेदी करुन नेव्हीनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला जवळपास १४ लाख रुपयांचा गंडा घातलाय. बँक खात्यांची माहिती चोरुन या टोळक्यानं ही ऑनलाईन फसवणूक केलीय.

बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Last Updated: Friday, November 29, 2013, 12:19

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी हजारो शेतकऱ्यांची सरकारी योजनेच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. तर या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी राका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पतीचे पैसे... बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी; अशीही भारतीय नारी!

Last Updated: Monday, November 25, 2013, 18:54

पतीचे पैसे बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी करण्यात उडवणाऱ्या एका पत्नीचं फेसबुकमुळे पितळ उघडं पडलंय. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यानंतच हे लग्न आता कोर्टात पोहचलंय.

गुप्त धनाचं आमिष दाखवून २ भोंदुबाबांनी फसवलं

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 16:57

देवळा तालुक्यातल्या हरी ओम बाबाचे काळे कारनामे चर्चेत असताना नाशिकमध्ये आणखी २ भोंदुबाबांचे प्रताप समोर आलेत. गुप्त धनाचं आमिष दाखवून जवळपास साडेचार लाखांना फसवलं गेल्याचं समोर आलंय.

भक्ताच्या नववधूसोबत भोंदूबाबा फरार!

Last Updated: Thursday, November 7, 2013, 14:24

नाशिकच्या देवळा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे एका भक्ताचं लग्न जमत नसताना त्याने भक्ताचं लग्न नोंदणीपद्धतीने लावून दिलं आणि नववधूला घेऊन बाबा फरार झालाय.

‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’ सृष्टी राणाचा मुकुट खोटा!

Last Updated: Thursday, November 7, 2013, 12:00

मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड भारताची सृष्टी राणा हिला मिळालेला मुकुट हा खोटा असल्याचं कळतंय. २०१३ची मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड बनण्याचा मान भारताच्या सृष्टी राणाला मिळाला. नुकतीच तिनं ही स्पर्धा जिंकलीय. मात्र मुकुट खोटा असल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटेल.

सावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 11:48

तेलही गेलं.. तुपही गेलं अशीच काहीशी अवस्था ठाण्यातल्या एका व्यावसायिकाची झालीय. तब्बल ७० लाखांचं त्याचं घर बनावट कागदी नोटांमध्ये विकलं गेलं.

आर्थिक गुन्हेगारीची नवी राजधानी- नागपूर!

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 17:53

नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

अक्षय खन्नाला शॉर्टकट पडला महाग, ५० लाख गमावले!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 10:30

कमी वेळ आणि पैसे दुप्पट, या आमिषाला अनेक जण बळी पडतात. आता यातच अभिनेता अक्षय खन्नाची भर पडलीय. कारण, अक्षयला पन्नास लाखांचा गंडा बसलाय. घसघशीत व्याजाच्या आमिषाला तो बळी पडला आणि त्यानं आपले ५० लाख रुपये गमावलेत.

गुंतवणूक कंपनीने केली लोकांची करोडोंची फसवणूक

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 20:38

नागपुरातल्या श्री सुर्या कंपनीनं हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक केलीय. दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत हि कंपनी सर्व सामान्य नागरिकांकडून गुंतवणुकीच्या सबबीखाली पैसे घेत होती. केवळ नागपुरातच नाही तर विदर्भातल्या अन्य जिल्ह्यातल्या नागरिकांचीही या कंपनीनं फसवणूक केलीय.

`आयआयटी` च्या माजी संचालकांची १९ लाखांची फसवणूक

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 08:46

आयआयटी कानपूरचे माजी संचालक आणि केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय धांडे यांची इंटरनेट बँकिंगद्वारं १९ लाखांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय.

बिग बींची फसवणूक, दोन लाखांची मदत घेऊन मुलींची आई बेपत्ता

Last Updated: Monday, September 9, 2013, 12:39

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पाटण्यातील दोन मुलींना दोन लाख रूपयांची मदत केली होती. मात्र त्या मुलींची आई ते दोन लाख रूपये घेऊन बेपत्ता झाल्याने बिग बी यांची मदत वाया गेली आहे.

बोगस `बीएसएनएल`नं घातला आठ लाखांचा गंडा

Last Updated: Friday, September 6, 2013, 20:50

‘बीएसएनएल’च्या नावाखाली तब्बल आठ लाखांना गंडा घातल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात घडलीय.

भोंदूबाबाने केली ८१ हजारांची फसवणूक

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 22:08

भोंदुबाबाच्या उपचारामुळे नागपुरात एक महिलेचा कॅन्सर बळावल्याचा प्रकार `झी मीडिया`नं नुकताच उघडकीस आणलाय. आता त्यापाठोपाठ नागपुरात आणखी एका भोंदूबाबानं एका युवतीला 81 हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय.

अबब...९० कोटींना बंटी-बबलीचा पुन्हा गंडा

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:36

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरात शेकडो गुंतवणूकदारांना बंटी-बबलीने फसविले आहे. `मनी मंत्र` नावाची एक शेअर गुंतवणूक करणारी कंपनी स्थापून या कंपनीने सुमारे ९० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

कोळ्यांचे सात किलो दागिने घेऊन सोनाराचा पोबारा

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 19:12

मुंबईतील माहुल कोळीवाड्यातील कोळी बांधवांची एका बंगाली सोनाराने जबरदस्त फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐन नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.

बहिणीच्याच नवऱ्याला घातला १० लाखांचा गंडा

Last Updated: Sunday, August 11, 2013, 09:30

मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अशा एका आरोपीला अटक केलीय ज्यानं गावची गहाण ठेवलेली जमीन सोडवण्यासाठी स्वतःच्या बहीणीच्या नव-याला एक दोन नाही तर तब्बल 10 लाखांचा गंडा घातलाय..

नागमण्याच्या नावाखाली विकला काचेचा मणी!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 17:55

नागमण्याच्या नावाखाली काचेचा मणी देऊन पंजाबी व्यापा-याची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार जळगावात उघड झालाय.

जमीन खरेदी विक्रीतील फसवणुकीने सुरेश वाडकर व्यथित

Last Updated: Sunday, July 14, 2013, 19:41

जमीन खरेदी विक्री करताना होणा-या फसवणुकीत महसूल यंत्रणाच सहभागी असल्याचा आरोप प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी केला आहे.

‘अंदमान-निकोबार’ची नाणी माहीत आहेत का?

Last Updated: Sunday, July 14, 2013, 09:17

भारताचाच भाग असलेल्या अंदमान-निकोबार आईसलँड नावाची खोटी नाणी सध्या चलनात आल्याची माहिती हाती लागलीय..

पुण्यात सायबर सुरक्षेची ऐशी तैशी!

Last Updated: Thursday, July 11, 2013, 20:37

आय टी कंपन्यांचीच सायबर सुरक्षा किती तकलादू असू शकते, याचं धक्कदायक उदाहरण पुण्यात समोर आलंय. एका नामांकित आय टी कंपनीमध्ये नोकरीच्या आमिषानं तरुणाची फसवणूक झाली. त्यामुळे हा प्रकार उघड झालाय. महत्वाचं म्हणजे पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या उभारणीत मदत करणा-या केपजेमिनी कंपनीच्या बाबतीत हा प्रकार घडलाय.

कपाटात टॉयलेट... टॉयलेटमध्ये चोर!

Last Updated: Monday, July 8, 2013, 12:06

अभिनेत्री सोनिका गिल हिचा नवरा मितेश रुघानी याला पोलिसांनी ज्वेलरची फसवणूक आणि तब्बल ८१ लाखांच्या दागिन्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक केलीय.

केदारनाथ: मदतीचा हात की ऑनलाईन घात!

Last Updated: Thursday, July 4, 2013, 16:55

उत्तराखंडाला मदत करण्याच्या नावाखाली अनेक खोट्या वेबसाईट आणि फेसबुक पेजेस तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी भारतीय हवाई दलाचंच नाव वापरलं जात आहे.

खांडवेच्या `सन सिटी`नं पुणेकरांना झाकोळलं!

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 12:10

फसवणुकीचा अजब आणि धक्कादायक प्रकार पुण्यात पुढे आलाय. पुण्याच्या अगदी जवळ बंगल्यांसाठी प्लॉट देतो, असं स्वप्न दाखवत, शेकडो पुणेकरांची फसवणूक करण्यात आलीय.

मराठी अभिनेत्रीला फसवून केले काँग्रेस नेत्याने लग्न

Last Updated: Saturday, June 29, 2013, 16:01

मंत्रालयात झालेल्या ओळखीतून पनवेलच्या नगरसेवकाने फसवून लग्न केल्याची तक्रार एका मराठी अभिनेत्रीने पुणे पोलिसांच्या महिला सहाय्यता कक्षात दिली आहे. या नगरसेवकाने पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवून तिच्याशी लग्न केल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

`नटरंग`चे फसवे `रंग`, हिरो होऊ पाहाणाऱ्यांचा `अपेक्षाभंग`!

Last Updated: Friday, June 28, 2013, 20:42

सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून 100 हून अधिक जणांना फसवणा-या एका भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केलीय.

सायबर कॅफेत जाताय, मग हे वाचाच?

Last Updated: Thursday, June 27, 2013, 13:14

एक महत्वाची सूचना, सायबर कॅफेमध्ये जाणाऱ्या मित्र मैत्रिणींसाठी ! तुम्ही जे काही संगणकावर ओपन कराल. त्याची सर्व माहिती सेव्ह होतेय, हेही तुमच्या लक्षात येणार नाही. मात्र, त्यानंतर तुम्ही डोक्याला हात लावून बसाल. तुमची फसवणूक होवू नये, म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

नाशिककरांची लाखो रुपयांची फसवणूक

Last Updated: Saturday, June 22, 2013, 12:01

नाशिक जिल्ह्यातील विविध भागात सध्या गुंठेवारीने प्लॉट विक्रीचे व्यवसाय सुरु आहेत. आरक्षित क्षेत्रात सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला जातोय...

बोले तैसा चाले त्याची...

Last Updated: Thursday, June 20, 2013, 08:10

आपल्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेचा उपयोग एखादा मनुष्य कशा रीतीने करतो, त्यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते.

सेक्सवर्कर सुंदर नव्हती म्हणून पोलिसांना केला फोन

Last Updated: Saturday, June 15, 2013, 13:21

सेक्सवर्कर म्हणजेच वेश्या सुंदर निघाली नाही म्हणून लंडनमध्ये एका व्यक्तीनं चक्क पोलिसांनाच फोन लावला. आपल्याला या सेक्सवर्करनं फसवलं अशी तक्रार दाखल करून घ्यावी, असा तगादाही त्यानं पोलिसांकडे लावला.

फसवणुकीविरोधात `शिवसेना स्टाइल` आंदोलन!

Last Updated: Thursday, May 30, 2013, 18:08

कोल्हापुरातल्या महालक्ष्मी फ्लोरिंग कंपनीच्या मालकांनी अनेक लोकांची गुंतवणुकीसाठी पैसे घेवून फसवणूक केल्याचं उघड झालंय. यावरोधात कोल्हापुरात शिवसेना स्टाइलने आंदोलन झालं.

तिसऱ्या लग्नाची `फसलेली` गोष्ट!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 16:46

तीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करणा-या एका महाठगाला मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे.

सुपरस्टार भरत जाधवची निर्मात्याकडून फसवणूक!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 16:13

मराठीतला सुपरस्टार भरत जाधवची फसवणूक झाल्याची बातमी समोर आलीय. ‘शिवाजी द रियल हिरो’ या सिनेमाचे निर्माते सदाशिव पाटील यांनी भरत जाधवची फसवणूक केली आहे.

औरंगाबादमध्ये २०० यात्रेकरूंची फसवणूक

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 09:47

औरंगाबादमध्ये आज 200 बौद्ध बांधवांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बुद्द गयाला घेवून जाण्यासाठी मुंबई,पुणे नाशिक आणि औरंगाबाद जिल्हातूनं लोक या टुरसाठी शहरात आले होते.

तुळजापूर मंदिरात तोतया पुजाऱ्यांकडून भक्तांची लूट

Last Updated: Thursday, May 9, 2013, 18:51

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात तोतया पुजा-यांकडून भाविकांची लूट आणि फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

बलात्काराच्या घटनांनी हादरली मुंबई

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 08:53

मुंबईत बलात्काराच्या तीन घटना उघडकीस आल्यात. दादर, कुर्ला आणि कांदिवली या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर या घटना घडल्यानं अवघी मुंबईच हादरून गेलीय.

राजकीय नेत्यांना गंडा घालणाऱ्याला अटक

Last Updated: Monday, March 25, 2013, 22:09

गरीब असल्याचं सांगत, आयएएस परिक्षेच्या कोचिंगसाठी आर्थिक मदत उकळणा-या एका मिस्टर नटवरलालला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे.

फसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप

Last Updated: Monday, March 4, 2013, 22:25

कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.

गरज पडली तर पुन्हा रामलीला मैदानात - अण्णा

Last Updated: Friday, February 1, 2013, 16:30

सरकारनं केवळ चर्चाच केली, सुधारणा मात्र नाही, असं म्हणत अण्णांना आता जनआंदोलन हाच एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट केलंय.

`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!

Last Updated: Monday, January 28, 2013, 20:36

केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.

आधार कार्डाच्या नावाने फसवणाऱ्या भामट्याला अटक

Last Updated: Thursday, January 24, 2013, 19:03

आधार कार्ड बनवून देतो असं सांगत शेकडो नागरिकांना गंडा घालणा-या भामट्याला पिंपरी-चिंचवडमध्ये अटक करण्यात आली आहे. आधार कार्ड बनवून देण्यासाठी त्यानं अजब शक्कल लढवली. पण शेवटी तो जाळ्यात अडकलाच.

२१२ शिक्षकांनी दाखल केलं बोगस अपंगांचं प्रमाणपत्र

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 20:53

केवळ प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी बोगस अपंगाचे प्रमाणपत्र सदर केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर मध्ये उघडकीस आली आहे. तब्बल २१२ शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सदर केले होते. परंतु प्रमाणपत्र सदर केलेले शिक्षक अपंग नसल्याचे कळताच ७६ शिक्षकांवर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

`एन मार्ट`ने घातला ग्राहकांना गंडा

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 19:43

मराठवाड्यात मल्टी लेव्हल मार्केटींग या गोंडस नावाखाली एन मार्ट नावाच्या कंपनीनं नागरिकांना 25 कोटींचा गंडा घातलाय.

लेडीज व्हर्सेस 'किरण देशपांडे'!

Last Updated: Sunday, November 4, 2012, 22:05

पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. संगणक अभियंता म्हणवणाऱ्या युवकाने तीन मुलींना कोट्यावधींचा गंडा घातलाय. किरण देशपांडे असं त्याचं नाव आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनं तीन उच्चशिक्षित तरुणींकडून पैसे उकळले.

चीन निघालं चाणाक्ष, भारताची सडली द्राक्षं

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 18:29

भारत आणि चीनमध्ये सात वर्षांपूर्वी एक निर्यात करार झाला. त्यानुसार चीननं सफरचंद निर्यात करायची आणि भारतानं नाशिकची द्राक्षं निर्यात करायची असं ठरलं. या करारात चीननं चाणाक्षपणा दाखवला पण भारताचे प्रतिनिधी अपयशी ठरले. परिणामी चीनमधून सफरचंद येतात, पण भारताची द्राक्षं मात्र चीनमध्ये पोहोचू शकली नाहीत.... नक्की काय घडलं?

टार्गेट पूर्ण करण्यासाठी केली तरुणाला फसवून नसबंदी

Last Updated: Monday, October 8, 2012, 16:32

आपले वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता चाकरमानी वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र एक परिचारिका कुठल्या स्तराला जाऊ शकते याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. देवरी तालुक्यातील भानोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोटी माहिती अर्जात भरून एका तरुणाची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये करोडोंचे जमीन घोटाळे

Last Updated: Thursday, September 13, 2012, 17:24

नाशिक शहरात शेकडो कोटी रुपयांचे जमीन घोटाळे उघडकीस येत असतांनाच महापालिकेबरोबरच हजारो नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. महापालिकेनं संपादित केलेली जमीन छोटे प्लॉट करून नागरिकांना विकून मूळ मालकांनी कोट्यवधींची माया गोळा केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

वसंत पुरकेंची `बनवा बनवी`

Last Updated: Thursday, August 30, 2012, 16:07

विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरकेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय. मुंबईत आशीर्वाद सोसायटीत फ्लॅट असल्याचं पुरकेंनी नमूद केलं होतं. मात्र माहितीच्या अधिकारात पुरकेंची बनवाबनवी उघड झालीय.

गृहनिर्माण विधेयक मंजूर... बिल्डरांना वेसण

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 10:52

बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विधानसभेत गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळं फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना वेसण घालायला मदत होणार आहे.

२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 09:30

25 लाखांची फसवणूक करणाऱ्या एका इसमाला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एटक केली आहे. भगवानदास महादेव मेजवानी असं आरोपीचं नाव आहे.

नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक

Last Updated: Thursday, April 19, 2012, 19:49

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात नोकरी देण्याचे आमीष दाखवून 25 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुजीत पाटील यानं या युवकांची फसवणूक केलीय.

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 15:21

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात दलालांचा सुळसुळाट

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 10:11

नाशिकच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश देतो, असं सांगून बंगळुरुच्या एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली. त्याला तब्बल पंचावन्न लाखांचा गंडा घालण्यात आलाय.