सुरज पांचोलीची ‘एक्स-गर्लफ्रेंड’ मीडियासमोर, Sooraj Pancholi ex-girlfriend defends him in Jiah Khan suicide case

सुरज पांचोलीची ‘एक्स-गर्लफ्रेंड’ मीडियासमोर...

सुरज पांचोलीची ‘एक्स-गर्लफ्रेंड’ मीडियासमोर...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जिया खान आत्महत्या प्रकरणात सुरज पांचोलीची एकेवेळची गर्लफ्रेंड असलेली जान्हवी तुराखिया ही अखेर समोर आलीय. या प्रकरणासंदर्भात बोलताना तीनं सुरजची भलावणी केलीय. ‘आम्ही जवळपास पाच वर्ष एकमेकांसोबत संबंधात होतो. पण, या पाच वर्षांत सुरजनं मला एकदाही मारहाणच काय पण, शिवीगाळसुद्धा केली नव्हती’ असं म्हणत सुरजनं जियाला मारहाण केल्याचं शक्यच नसल्याचं जान्हवीनं म्हटलंय.

सुरज पांचोली आणि जानवी तुराखिया जवळपास पाच वर्ष एकत्र होते. जिया खान हत्या प्रकरणात सुरजवर केल्या गेलेल्या विविध आरोपांमुळे तिला धक्का बसलाय. तिच्या म्हणण्यानुसार सुरजवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून त्याला यात अडकवलं जात आहे.

‘पत्रकारांनी येऊन त्रास देऊ नये, आपल्या घराबाहेर सतत रेंगाळत बसू नये म्हणून मी आत्तापर्यंत कॅमेरासमोर आले नव्हते’ असं जान्हवीनं स्पष्टीकरण दिलंय. मात्र, आता तिने कॅमेरासमोर येऊन सुरज पांचोली याला गरज नसताना याप्रकरणात गोवलं जात असल्याचे सांगितले आहे. ‘मला जिया खानच्या जाण्याबद्दल दु:ख आहे. पण, सुरजबद्दल जे काही बोललं जातंय त्यावर मात्र माझा अजिबात विश्वास बसत नाही... आमच्या ब्रेक अप नंतरही आम्ही चांगले मित्र होतो त्यामुळे मी त्याला चांगलच ओळखते’ असंही तिनं म्हटलंय.

सुरज, त्याचे आई-वडील तसेच आपले घरातल्यांचे अगदी जवळचे संबंध असल्याचं तिनं सांगितलंय. सुरज आपल्या ड्रायव्हरपासून घरातल्या नोकरांबरोबरही अगदी चांगल्याप्रकारे वागतो... त्यामुळे तो असं कधीच करणार नाही, असं ठाम मत तिनं पत्रकारांसमोर बोलताना मांडलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 25, 2013, 11:54


comments powered by Disqus