रणबीर - कतरीनाचे मार्ग वेगवेगळे झालेत?, Splitsville for Ranbir Kapoor, Katrina Kaif

रणबीर - कतरीनाचे मार्ग वेगवेगळे झालेत?

रणबीर - कतरीनाचे मार्ग वेगवेगळे झालेत?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमधली हॉट जोडी म्हणून ओळखली जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्यात काहीतरी बिनसलंय. त्यांचं नातं कडवट नाही पण, थोडंफार आंबट झाल्याचंच सध्या दिसून येतंय.

रणबीर आणि कतरीना यांचा रोमान्स आणि लग्न हा सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त चर्चिला जाणारा विषय आहे. परंतु, सध्या येणाऱ्या बातम्यांनुसार, रणबीर आणि कतरीना या दोघांमधले प्रेमसंबंध संपूर्णरित्या संपुष्टात आले आहेत. रणबीरनं मांडलेल्या लग्नाच्या प्रस्तावाला ठोकर देण्याचं कारण म्हणजे कतरीनाचं आपल्या करिअरवर जास्त लक्ष देणं आहे, असं म्हटलं जातंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेहून परतल्यानंतर रणबीर आणि कतरीना यांनी एकमेकांशी अद्याप संपर्क साधलेला नाही. दोघंही `कमिटमेंट` या विषयावरही दोघांचे काही इश्यू आहेत. तुम्हाला लक्षात असेलच की काही दिवसांपूर्वी, कतरीना स्वत:ला असुरक्षित समजतेय आणि तिला रणबीरशी काही कमिटमेंट करायची आहे परंतु, रणबीर यासाठी तयार नाही, अशा आशयाच्या काही बातम्या तुम्हीही वाचल्या असतीलच.

अमेरिकेत नवीन वर्षाची सुरुवात एकत्र केल्यानंतर हे दोघंही वेगवेगळी भारतात परतले होते. रणबीर आणि कतरीनानं आपल्या प्रेमसंबंधांची कबुली कधीही मीडियासमोर दिली नाही किंवा आपल्या ब्रेकअपसंबंधीही चक्कार शब्द अद्याप तरी काढलेला नाही.

रणबीर आणि कतरीनानं `अजब प्रेम की गजब कहानी` आणि `राजनीती` या सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. `अजब प्रेम की गजब कहानी` या सिनेमादरम्यान या दोघांच्या रोमान्सच्या बातम्यांना हवा मिळाली होती. त्यानंतर या दोघांनी स्पेनमध्ये घालवलेल्या सुट्ट्यांनंतर ही जोडी पुन्हा एकदा चर्चिली गेली होती.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 22, 2014, 14:07


comments powered by Disqus