शाहरुखने कतरिनाला `हिंदी`पासून वाचवलं SRK helps katrina

शाहरुखने कतरिनाला `हिंदी`पासून वाचवलं

शाहरुखने कतरिनाला `हिंदी`पासून वाचवलं
www.24taas.com, मुंबई

कतरिना कैफचं हिंदी खरोखरच ‘माशाल्ला’ आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिला हिंदीचं ज्ञान नसूनही ती आज बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. याचं प्रमाण म्हणजे जेव्हा तिच्या हिंदीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं, तेव्हा सुपरस्टार शाहरुख तिच्या मदतीला धावून आला.

कतरिना आणि शाहरुख आपल्या टीमसोबत जब तक है जानच्या प्रमोशनसाठी दिल्लीला गेले होते. या वेळी एका पत्रकाराने कतरिना कैफला तिच्या चित्रपरटामधील भूमिकेबद्दल हिंदीमध्ये प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना कतरिना कैफ इंग्रजीत बोलू लागली. यावर पत्रकाराने आक्षेप घेत म्हटलं, की कतरिनाने हिंदीतच उत्तर द्यावं, कारण ती हॉलिवूडमध्ये नाही बॉलिवूडमध्ये काम करते.

प्रसंगातून उद्भवणारा वाद लक्षात घेऊन शाहरुखने हस्तक्षेप केला आणि तो म्हणाला, कतरिनाला हिंदी येतं आणि ती हिंदीमध्ये स्वतःच डबिंग करते. इतरवेळी ती कुठल्या भाषेत बोलते, यावर प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. कलाकार ज्या भाषेत सहज व्यक्त होऊ शकतो, त्या भाषेत कलाकारांनी संवाद साधावा. शाहरुखने अशा प्रकारे कतरिनाचा बचाव केल्यावर कतरिनाने इंग्रजीमध्ये मोकळेपणाने आपलं उत्तर दिलं.

First Published: Monday, November 12, 2012, 17:34


comments powered by Disqus