शाहरुखच्या `छल्ला`ची युट्युबवर धूम SRK`s Challa become superhit on youtube

शाहरुखच्या `छल्ला`ची यू ट्युबवर धूम

शाहरुखच्या `छल्ला`ची यू ट्युबवर धूम
www.24taas.com, मुंबई

रोमांसचा बादशाह म्हणून ओळख असलेला बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान सध्या त्याच्या ‘जब तक है जान’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘रा-वन’ आणि ‘डॉन-2’ या ऍक्शन थ्रिलर्सनंतर शाहरूख खान आता सिनेचाहत्यांना रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. शाहरूखचा आगामी चित्रपट ‘जब तक है जान’चं “छल्ला की लभ दा फिरे...“ हे गाणं प्रेक्षकांना इतकं आवडलंय की गेल्या आठवड्याभरात यू-ट्यूबवर हे गाणं सर्वाधिक वेळा पाहिलं गेल्याची नोंद करण्यात आलीय.

हातात गिटार घेऊन शाहरूखला स्टाईलमध्ये चालताना पाहून त्याच्या जुन्या चित्रपटांची क्लिप डोळ्यासमोर येते. रॉमेंटिक फिल्मसाठी प्रसिध्द असलेले दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मोठ्या गॅपनंतर या सिनेमाच्या दिग्दर्शनाचं केलंय.
जब तक है जानचं ‘छल्ला की लभ...’ गाणं यू-ट्यूबवर आतापर्यत ४४,८६,७९३ वेळा पाहिल गेलंय. शाहरूख खानने स्वतः यासाठी ट्विटरवर आपल्या फॅन्सना थॅंक्स म्हटलंय.

आदित्या चोप्रा हे “जब तक है जान” सिनेमाचे निर्माता असून हा चित्रपट येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला बॉक्सऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज झालाय. सुप्रसिध्द संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाला संगीतबध्द केल असून गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. या गाण्यासाठी ‘बुल्ला की जाणा मै कौन’ य़ा गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रब्बी शेरगिल या लोकप्रिय गायकाने स्वरसाज चढवला आहे.

First Published: Sunday, October 7, 2012, 22:34


comments powered by Disqus