शाहरुखला हवाय एक दिवस स्वतःसाठी SRK wants one day for himself

शाहरुखला हवाय एक दिवस स्वतःसाठी

शाहरुखला हवाय एक दिवस स्वतःसाठी
www.24taas.com, मंबई

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तमाम चाहते मंडळी, कुटुंब, मित्र मंडळी यांच्या सतत गराड्यात राहून आणि सगळ्यांचं अलोट प्रेम मिळत असूनही शाहरुख खानला एकटं असल्याचं वाटत राहातं.

शाहरुख खान म्हणाला, “मला एकदा स्वतःसाठी एक दिवस हवा आहे, पण हा दिवस कुणाकडे मागू मी? मी प्रत्येक जण माझ्यासोबत असावा, अशी अपेक्षा नाही करू शकत. कारण, प्रत्येकाचं स्वतःचं आयुष्य असतं. त्यामुळे कधी कधी आपण एकटे पडतो.”

४७ वर्षीय शाहरुख खान कामामध्ये सतत व्यस्त असतो. रेड चिलीज एंटरटेनमेंट ही त्याची स्वतःची प्रोडक्शन कंपनीही तो संभाळतो. कोलकाता नाइट रायडर्स ही आयपीएल क्रिकेटची टीमही त्याची आहे. हा सगळा व्याप संभाळत असताना शाहरुखला बऱ्याचवेळा आयुष्यातील लहान लहान गोष्टींमधल्या आनंदाला मुकावं लागतं. ही गोष्ट शाहरुखला सतत काचत असते.

“मला माझ्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाणं, सिनेमांना जाणं नाही जमत. माझ्या घरच्यांना वाटतं, मला या गोष्टींचा त्रास होईल. त्यामुले ते मला घेऊन जात नाहीत त्यांच्यासोबत... पण या गोष्टीचा मला त्रास होतो.” असं शाहरुख म्हणाला.

First Published: Sunday, November 11, 2012, 21:52


comments powered by Disqus