Last Updated: Wednesday, July 18, 2012, 14:36
९ डिसेंबर १९४२ ला राजेश खन्नांचा अमृतसरला जन्म. जतीन खन्ना नाव. २४ व्या वर्षी म्हणजेच १९६६ ला आखिरी खत या चित्रपटातून कारकिर्दीला सुरूवात... त्यानंतर राज, बहारों के सपने, औरत के रुप असे सिनेमे केले पण १९६९ मध्ये आलेल्या आराधनाने खरे यश मिळवून दिले. त्यानंतर एकामागोमाग १४ सुपरहिट फिल्मस देण्याचा मान राजेश खन्नालाच जातो. त्यामुळंच ते हिंदे सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.